Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर तालुक्यातील कृषी व्यवसायिकांचा कडकडीत बंद 

 मंगरूळपीर ता ४/  महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्रमांक 40,41,42,43 व 44 मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रास्ताविक पाचही कायदे रद्द करण्यात येऊन कृषी विक्रेत्यांवर अन्यायकारक असणाऱ्या प्रास्ताविक कायद्याच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर 3 दिवस मंगरूळपीर तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून शासनाचा निषेध केला.
 गेल्या दोन दीवसापासून तालुक्यातील सर्वच कृषी प्रतिष्ठान बंद असून बंद मुळे रबी हंगामात गहू, हरभरा,तुर, कपाशी पेरणीची व फवारनीची लगबग करणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र बंदमुळे धांदल उडाली असून खरीप हंगामात पुरेसा पावसाअभावी आधीच मेटा कुटीस आलेला शेतकरी वर्ग मात्र सदर बंद मुळे अधिकच अडचणीत आला आहे.  मंगरूळपीर तालुक्यातील सुमारे ११० विक्रेत्यांनी एकाच वेळी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवल्यामुळे सर्वत्र शेतीचे कामे ठप्प झाली  असून या बंदचा सर्वाधिक परिणाम शेतकरी वर्गात होऊन शेतीची दैनंदिन कामे थांबली आहेत.प्रस्तावित कायद्यामुळे कृषी विक्रेत्यावर अन्याय होणार असून त्यांची गणना मुंबई झोपडपट्टी गुंड ॲक्ट मध्ये शासनाने प्रस्तावित केल्याने त्यांची प्रतिष्ठा धुळीत मिळवण्याचे कारस्थान असून यासह पाचही विधेयक कायदे कृषी व्यवसायकावर अन्यायकारक करणारे आहेत त्यामुळे शासनाने सदर कायदे मागे घ्यावे याकरिता तीन दिवसीय बंद पाळले. 
ता 4 रोजी तालुक्यातील कृषिसेवा केंद्र संचालकांची येथील विश्राम गृहावर बैठक झाली असून जर सरकारने आमची मागणी मान्य केले नाही तर पुढील दिशा ठरविण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली यावेळी कृषी सेवा केंद्राचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments