Ticker

6/recent/ticker-posts

संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन,संस्कार,सोहळा व संगीत महोत्सव - धम्मनंद उचित

नवयुवक पंचशील मंडळ मंडळ,भारतीय बौध्द महासभा समता सैनिक दल ग्राम शाखा चिंचखेडा, यांच्या वतीने संविधान दिन 26/11/ 2023 निमित्त दरवर्षी प्रमाणे मार्गदर्शन, संस्कार,सोहळा व संगीत महोत्सव ठेवण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्तिती म्हणून मा.डॉ. सिद्धार्थजी देवळे (पश्चिम विदर्भ अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी) होते, व प्रमुख मार्गदर्शक प्रा. ऍड. मुकुंद वानखडे (भारतीय बौध्द महासभा तालुका अध्यक्ष वाशिम,यांनी संविधानिक मौलिक अधिकार या विषयावर सखोल व्याख्यान केले त्याच बरोबर आद. अनिता गणेश कोरडे (जिजाऊ बिग्रेड जिल्हा अध्यक्ष वाशिम) यांनी कौटुंबिक हिंसाचार व समुपदेशन विशेष माहिती या विषयावर सखोल माहिती दिली. 
कार्यकारामच्या दुसऱ्या टप्यात प्रकाश शामराव कोरडे (औषधनिर्माण अधिकारी मा.न.पा पुणे) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व या नंतर डॉ. काशीराम खडसे, मोतीराम खडसे, महादेव भगत, नारायण खडसे, या लोककलावनंताचा मरणोत्तर त्याचा सत्कार कारण्यात आला.तिसऱ्या टप्यात संविधान दिन 2023 अनुसंघाने सुदेश पैठणे, भास्कर गायकवाड, दिव्या बासोले, कपिल खडसे, प्रणव खडसे, स्वरछंद कलासंच वाशिम यांच्या वतीने सांगितमय कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी धम्मानंद उचित, संघपाल खडसे, नवयुवक पंचशील मंडळ चिंचखेडा यांनी अथक प्रयत्न घेतले. कार्यकामाचे सूत्रसंचालन धम्मानंद उचित व आभार भारत खडसे (माजी सरपंच) यांनी केले आणी त्यानंतर कार्यकारामची सांगता करण्यात आली

Post a Comment

0 Comments