Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री गजाननराव अवताडे तर जिल्हा सरचिटणीस पदी श्री आत्मारामजी सोमटकर यांची नियुक्ती


प्रतिनिधी।कारंजा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत होऊन मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे हस्ते दिनांक २४ नोव्हेंबर रोजी राकापा पक्ष कार्यालय कारंजा येथे जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री गजाननराव जिजबाराव अवताडे व जिल्हा सरचिटणीस पदी श्री आत्मारामजी किसनराव सोमटकर यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्त करण्यात आली.यावेळी राकापाचे श्री प्रशांत गोळे,वाशिम तालुकाध्यक्ष श्री सुनील पाटील अखंड,रिसोड तालुकाध्यक्ष श्री अशोक जाधव व मालेगाव तालुकाध्यक्ष श्री सुशांत जाधव,श्री शिवाजीराव जाधव,श्री,अमोल धोंगळे व श्री आकाश शिंदे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी  उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments