वाशिम जिल्हा सह इतरही विदर्भाच्या काही जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असते अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान झाले आहे. व ढगाळ वातावरणाचा तुरीला सुद्धा फटका बसला आहे. तुरीचा फुलोरा काही शेतात बहरला असून त्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव स्पष्टपणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे ढगाळ वातावरणाने यात भर पाडली असुन शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसकावल्याचे दिसून येत आहे. राजकारणाच्या वळाताळीमुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसा भावही मिळत नाही आपलं गरान सांगावं असं हक्काचही कोणी दीसत नाही. शेतकऱ्याच्या पाचवीला जणू दुःखच पूजलं असाव अशी चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यावर्षी चांगल्या प्रतीचा पाऊस झाल्याने खरीप हंगामा मध्ये पेरल्या तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फुले लागल्याने यंदा तूर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे परंतु जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे. यावर्षी खरीप मध्ये जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अवकाळी पाऊस व रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली होती त्यामधील नुकसान भरून निघावे याकरिता शेतकऱ्यांना आशा होती ती तूर पिकाबाबत परंतु ऐन शेगा येण्याच्या काळात अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. सोयाबीन असो पांढर सोन असो तूर असो शेतकरी मित्रांनो आपला कोणीच वाली नाही राजकारण करणाऱ्यांन च्या ताटात पोटभर जेवण मिळत असल्यामुळे आपला विचार कुठेच दिसून येत नाही. वरवर तोंडावरचे बोंड आणणारे व गोड बोलून काटा काडणारे निसर्ग असो की राजकारणी कधी दगा फटका करतील शेतकरी राब राब राबतो शेतात कबाळ कष्ट करून पिकाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो व अवकाळी पाऊस अचानक येऊन होत्याचं नव्हतं करतो.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments