अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा वर्धापन दिन पन्हाळा येथे उत्साहात
वाशिम - प्रसिध्द शायर राहत इंदौरी यांच्या ‘जहाँ न पहुंचे रवि वहाँ पहुंचे कवि’ या ओळीप्रमाणे ज्या ग्रामीण व दुर्गम भागात मोठे डॉक्टर्स पोहचू शकत नाहीत तेथे सहयोगी डॉक्टरांनी आपली जबाबदारी ओळखून ग्रामीण भागात इमानेइतबारे आरोग्यसेवा अबाधीत ठेवली आहे. त्यामुळे या सहयोगी डॉक्टरांच्या संपुर्ण संरक्षणासोबत त्यांच्या हक्क व अधिकारासाठी लढणारी अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशन ही वरदान ठरली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काऊंन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे प्रबंधक नारायण नवले यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केले.
बुधवार, २९ नोव्हेंबर कोल्हापूर जिल्हयातील ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या पन्हाळा येथील न.प. सांस्कृतीक हॉलमध्ये असोसिएशनचा सातवा भव्य आणि दिमाखदार वर्धापन दिन सोहळा संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांच्या पुढाकारातून व देशभरातील दोनशेहुन अधिक सहयोगी डॉक्टरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटीका नगराध्यक्षा सौ. रुपालीताई धडेल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून विधिज्ञ अॅड. स्वप्नील वानखेडे, उपनगराध्यक्ष चेतन भोसले, निसर्गोपचार तज्ञ डॉ. सौ. स्नेहल जाधव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुमेह तज्ञ डॉ. अमित असळकर, ग्लोबल अप्टोमेट्री असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ बोराटे, प्रमुख अतिथी म्हणून अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. टिना राठोड, राष्ट्रीय सचिव डॉ. रमेश लबडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रकाश माळी, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. शब्बीर शेख, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. सौ. मनिषा सिरसाट, प्रसिध्दी प्रमुख डॉ. सुभाष सिरसाट, महिला सचिव डॉ. श्यामा कांबळे, प्रदेश सहसचिव डॉ. संदीप राठोड, प्रदेश युवा अध्यक्ष डॉ. गजानन बाजड, प्रदेश युवा सचिव डॉ. प्रकाश मलीक यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकातून डॉ. माधव हिवाळे यांनी असोसिएशनच्या गेल्या सहा वर्षातील कारकिर्दीचा आढावा व वाटचाल विषद केली. आरोग्य सेवेमध्ये शासन आणि प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या सहयोगी डॉक्टरांचे अस्तित्व जोपासून आरोग्य सेवेतील विविधांगी क्षेत्रात त्यांची रुजवणूक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. रुपाली धडेल यांनी उद्घाटकीय मनोगतात केले. नारायण नवले यांनी असोसिएशनच्या कार्याचे कौतूक करुन म्हटले की, अनेकतेमध्ये एकतेचे प्रतिक असलेल्या भारतात अनेक प्राचीन पॅथी अस्तित्वात असून या पॅथी मानवाच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत. यामध्ये अतिप्राचीन असलेल्या अॅक्युपंक्चर पॅथीचा प्रचार-प्रसार होण्यासाठी आणि अधिकाधिक वापर होण्यासाठी चौफेर प्रयत्न करण्याची गरज आहे.
कार्यक्रमात ग्रामीण आणि दुर्गम भागात उत्कृष्ट सेवा देणार्या मेडीसीन, नॅचरोपॅथी, इलेक्ट्रो होमीयोपॅथी, अॅक्युपंचर, अॅक्युप्रेशर, बायोकेमीकल, आर्युवेद, हर्बल, नाडी परिक्षण यासह इतर ग्रामीण व शहरी वैद्यकीय क्षेत्रातील ५० हून अधिक डॉक्टर्स बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून विशेष वैद्यकीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉ. माधव हिवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments