क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम व फिल्ड आर्चरी असोसिएशन वाशिम जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 9 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे जिल्हास्तरीय फिल्ड अर्चरी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातील 14 /17 /19 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी नीं मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. गट इंडियन राउंड/, फिटा राउंड / कंपाउंड राउंड या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरा च्या हस्ते मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांची शालेय विभागीय फिल्ड आर्चरी स्पर्धा करिता निवड झालेली आहे. या स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता मॅडम, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री किशोर बोन्डे क्रीडा अधिकारी, मारुती सोनकांबळे क्रीडा अधिकारी व क्रीडा कार्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात फिल्ड आर्चरी असोसिएशन वाशिम चे अध्यक्ष जगन्नाथ उगले, सचिव सौ नंदा उगले, उपाध्यक्षा सौ रुक्मिणी भोयर , अनिल राऊत, ज्ञानेश्वर ठाकरे, गणेश भोयर, महादेव ठाकरे, गजानन जाधव, सर्व पदाधिकारी यांनी व पंच कोअरर यांनी व उपस्थित क्रीडा शिक्षक टीम मॅनेजर कोच यांनी मोलाचे सहकार्य केल विजयी स्पर्धाकांना पुढील विभागीय स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.
0 Comments