वाशिम जिल्ह्यातील बस स्थानकामध्ये महिलांसाठी सुलभ शौचालय असून त्या शौचालयाची दयनीय अवस्था आहे
आगार प्रमुख वाशिम ,मालेगाव,रिसोड,मंगरूळपीर,कारंजा मानोरा,यांनी व्यवस्थापन गरजेचे असून लांब पडल्यावर येणाऱ्या बस बस स्थानकावर उभ्या राहतात कॉलेजमध्ये व शाळेमध्ये जाणाऱ्या ग्रामीण भागातल्या मुलींना बराच वेळ बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबावे लागते मात्र महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यामुळे महिलांना व मुलींना विनाकारण त्रास सोसावा लागत असून महिलां विविध आजारांना बळी पडत आहेत. काही बस स्थानकावर स्वच्छता गृह आहेत पण त्यामध्ये स्वच्छता नसून पाण्याची व्यवस्था नाही किंवा काही स्वच्छतागृहांना दरवाजे नाही आणि आजूबाजूचा परिसरही अस्वच्छ आहे असल्याचे वास्तव या मध्ये नमूद केले आहे. एसटी मध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यामुळे प्रत्येक बस स्थानकावर महिलांची मुलींची गर्दी खूप आहे .अशा परिस्थितीमध्ये महिलांसाठी व्यवस्थित स्वच्छतागृह नसल्यामुळे याचा त्रास व त्याचा परिणाम महिलांच्या मुलींच्या आरोग्यावर होत आहे. वाशिम जिल्ह्यातील सहा ही तालुक्याचे यामध्ये वाशिम,रिसोड मालेगाव , मंगरुळपीर कारंजा ,मानोरा, तालुक्यातील बसस्थानकामध्ये महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध नसल्या बाबत व स्वच्छता गृहाची पाहणी करून बस स्थानकावर येणाऱ्या मुलींना व महिलाना होणारा त्रास कसा थांबविता येईल यासाठी वाशिम जिल्हाधिकारी मॅडम ने गांभीर्याने लक्ष घालावे असे निवेदनाद्वारे श्रीमती अश्विनीऔताडे अध्यक्ष जिव्हाळा बहुद्देशीय संस्था जोगलदरी ता. मंगरूळपीर जि.वाशिम यांनी मागणी केली असून निवेदनाच्या प्रति सहाय्यक अधीक्षक सविता डांगे मॅडम, मा, जिल्हाधिकारी वाशिम व आगार प्रमुख वाशिम यांना दिल्या असून या निवेदनाची दखल सुद्धा वरिष्ठ स्तरावर घेण्यात यावी व महिलांना सुलभ शौचालय उपलब्ध करून महिलांना होणारा त्रास थांबवा असेही निवेदनात नमूद केले होते.
निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाला तात्काळ पाहणी करून आदेश करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिले महिलांना होत असलेल्या त्रासा पासून लवकरच सुटका होणार
उपरोक्त संभांकित विषयान्वये निवेदनकर्ते श्रीमती, अश्विनी औताडे अध्यक्ष, जिव्हाळा बहुद्देशीय संस्था जोगलदरी ता. मंगरूळपीर जि. वाशिम यांचे या कार्यालयास निवेदनाची दखल घेऊन आदेश पारित केले आहे oc जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
0 Comments