खरेदीदार सर्वोत्तम निवडीवर तोडगा काढू शकतील आणि आदर्श निर्णयावर निर्णय घेऊ शकतील या उद्देशाने ग्राहक जागरूकता महत्त्वपूर्ण आहे.
मंगरूळपीर दि.24 धकाधकीच्या जीवनात बदलता काळ लक्षात घेता ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपले प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून न्याय मिळवून द्यावा.असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वीरेंद्रसिंह ठाकूर ज्येष्ठ पत्रकार यांनी केले.
मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्या सभागृहात
शितलताई बंनगर तहसीलदार मंगरुळपिर , व सखारामजी मुळे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 24 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे
आयोजित करण्यात आले होते
याप्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
मंचावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक .
प्रा.सुधीर घोडचर अशासकिय सदस्य, महाराष्ट्र, राज्य ग्राहक परिषद मुंबई. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष वीरेंद्रसिंह ठाकूर ज्येष्ठ पत्रकार , सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या वनमालाताई पेंढारकर, यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा डॉक्टर अनंत शिंदे, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव इंगोले, पत्रकार नाना देवळे, अन्नपुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक सीमाताई दोंदल
, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी इत्यादींची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा.सुधीर घोडचर अशासकिय सदस्य, महाराष्ट्र, राज्य ग्राहक परिषद मुंबई. ग्राहक म्हणून आपलेही काही कर्तव्य असायला पाहिजे.आपण आपले प्रश्न लोकशाही मार्गाने व अभ्यासपूर्ण मांडले असता त्याची सोडवणूक निश्चितच होते. येत्या जानेवारी महिन्यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची व ग्राहक पंचायतच्या सदस्यांची एक समन्वय सभा आयोजित करून नगरपरिषद कर आकारणीवर होत असलेल्या पिळवणुकीबद्दल अभ्यासपूर्वक ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेगवेगळे कायदे व ग्राहकांनी आपल्या बाजू कशा पद्धतीने मांडाव्या या सर्व गोष्टींचा दृष्टांता सह उलगडा करून उपस्थितांना समजेल अशा शब्दात मोलाचे मार्गदर्शन केले भारतीय ग्राहक हा उत्सवप्रिय असल्यामुळे कुठलाही सण, उत्सव म्हणजे खरेदीला उधान... त्यामुळे व्यापारी याचा गैरफायदा घेवून वस्तुंच्या किंमती वाढवितात ही बाब लक्षात घेण्याची तयारी ग्राहकाची नसते. या दिवसात पैसा हाती असला की खर्च करायची इच्छा निर्माण होवून तो बाजारपेठेत खेचला जातो कधी आवश्यक तर कधी अनावश्यक वस्तुंची खरेदी करतो, घेतलेल्या वस्तुचे २/४ दिवस कौतुक होतं नंतर ती वस्तु अडगळीत जाते ते कळत देखील नाही. व्यापारी मात्र गाहकाच्या 'उपभोगवादी' स्वभावाचा फायदा उचलतात.
कुठल्याही ग्राहकाला अडचण आल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आव्हान याप्रसंगी प्रा.सुधीर घोडचर
यांनी केले .
या कार्यक्रमासाठी
गजानन राऊत , निलेश पाटील, राजु मनवर, ईजाज परसूवाले , देवा जाधव ,सुनिल भगत पत्रकार, विलास ईगोले, विजय खाडे, नारायण बाहेती, चक्राणारायण , पंकज येवले, भोजणे, गणेश शिंदे, पंणासे ,गोवर्धन मनवर मंडलाधिकारी ) महामुनी तलाठी, देशमुख तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार ,पेट्रोल पंप संचालक ,शहरातील व्यापारी , शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सुधाकर चौधरी यांनी केले व आभार प्रदर्शन अन्नपुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक सीमा दोनदलं यांनी केले
0 Comments