मन की बात
मंगरूळपीर तहसील परिसरात या रथाचे उद्घाटन शितलताई बंनगर तहसीलदार मंगरुळपिर यांच्या हस्ते करण्यात आले , या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
माजी नगराध्यक्ष प्राध्यापक वीरेंद्रसिंह ठाकूर, माजी नगरसेवक अनिल गावंडे, न प o s इंगोले , वाशिम जिल्हा नोडल अधिकारी गजानन माळेकर, न प अभियंता दिनेश राठोड, कर्मयोगी बापूरावजी चौधरी एनजीओ चे अध्यक्ष शेषरावजी चौधरी, न प चे आरोग्य अधिकारी राजू संगत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी राहुल भगत, दिनेश व्यास, सचिन कुलकर्णी, न प चे सर्वच कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते
• नारी शक्ती वंदन कायदा :
भारताच्या संसदेने 'नारी शक्ती
वंदन विधेयक' मंजूर केले, जे आपल्या लोकशाहीच्या संकल्प शक्तीचे उदाहरण आहे. विकसित भारताच्या संकल्पाला वेग देण्यासाठीही याचे तितकेच सहाय्य होणार आहे.
• आत्मनिर्भर भारत : 'व्होकल फॉर लोकल' चा प्रतिसाद
आत्मनिर्भर भारताची कवाडे खुली करत आहे. रोजगार सुनिश्चित करत आहे. देशाच्या संतुलित विकासाची हमी देत आहे.
• स्वदेशीवर भर : दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजा या
सणासुदीच्या काळात देशात चार लाख कोटीहून अधिक उलाढाल झाली. या काळात स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचा मोठा उत्साह दिसून आला. व्होकल फॉर लोकलचे हे अभियान देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे.
• पेटंटमध्ये वृद्धी : 2022 मध्ये भारतीयांच्या पेटंट साठीच्या
अर्जामध्ये 31 टक्क्याहून जास्त वाढ झाली आहे. 10 वर्षापूर्वीच्या आकडेवारीशी तुलना करता आज आपल्या पेटंटना मिळत असलेली मंजुरी 10 पट जास्त आहे.
• बालकांना मदत : कोईमतूर इथे राहणारे लोगानाथन,
लहानपणी गरीब मुलांचे फाटके कपडे पाहून खिन्न होत असत. अशा मुलांना मदत करण्याचा त्यांनी निश्चय केला. गेली 25 वर्षे ते हे कार्य करत असून आतापर्यंत 1,500 पेक्षा जास्त मुलांना त्यांनी मदत केली आहे.
• बेल्जीपुरम युथ क्लब : आंध्र प्रदेशमधल्या श्रीकाकुलम इथला बेल्जीपुरम युथ क्लब गेल्या चार दशकांपासून कौशल्य विकासाला समर्पित आहे. त्यांनी 7000 महिलांचे सबलीकरण केले आहे, बालमजुरीत अडकलेल्या मुलांना कौशल्य प्रदान केले असून शेतकऱ्यांनाही प्रशिक्षित केले आहे.
• पश्मीना शाल : पश्मीना शालींबद्दल आपण खूप ऐकले
असेलच. गेल्या काही दिवसांपासून लडाखी पश्मीनाची चर्चा आहे. लडाखी पश्मीना लूम्स ऑफ लडाख या नावाने जगभरातल्या बाजारात पोहोचत आहेत.
• अनोखे प्रदर्शन : 'मन की बात' ने प्रेरित होऊन अहमदाबाद
जवळच्या तीर्थधाम प्रेरणा तीर्थ ने एक आगळे प्रदर्शन लावले आहे. यामध्ये देश-विदेशातले 100 हून अधिक प्राचीन रेडीओ ठेवण्यात आले आहेत. 'मन की बात' चे आतापर्यंतचे सर्व भाग इथे ऐकता येतात.
• जैव खते : कर्नाटकमधल्या चामराजनगर इथे राहणाऱ्या वर्षा
यांना 'मन की बात'मधून आपणही काही निर्माण करावे यासाठी प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाच्या एका भागापासून प्रेरणा घेऊन त्यांनी केळ्यापासून जैव खत तयार करण्याचे काम सुरु केले.
• दहशतवादाचा बीमोड : 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी
मुंबईला लक्ष्य करत अवघ्या देशाला हादरवून सोडले होते. भारताचे हे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून सावरून भारत आता नव्या उमेदीने दहशतवादाचा बीमोडही करत आहे.
एकविसाव्या शतकातल्या भारताने आता विकसित भारताच्या मार्गावर पाऊल ठेवले असून 2023 हे वर्ष त्याचा पाया ठरला आहे गेले एक वर्ष अशा कामगिरीने युक्त आहे ज्यामुळे जगभरात भारताचा सन्मान द्विगणित झाला आहे. देशाची जनता करत आहे परिवर्तनाचे नेतृत्व इत्यादी माहिती संकल्प यात्रेच्या रथाचे मंगरूळपीर तहसील परिसरात उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
0 Comments