Ticker

6/recent/ticker-posts

स्व.मधुकरराव सपकाळ कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयात शिवजयंती संपन्न.


 पिंप्री अवगण_ :-         मंगरूळपीर तालुक्यातील       पिंप्री अवगण  येथे युगपुरुष, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.      कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री मयूरजी लिखार हे उपस्थित होते.
        त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव प्रा.सुनील सपकाळ उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्वच प्रकारच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे,  त्याचप्रमाणे छोट्या नाटिका सुद्धा सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुनिल सपकाळ मार्गदर्शन करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हा भारतीयांच्या मनात स्वदेश चेतना,राष्ट्र चेतना निर्माण करून या राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा मार्ग आम्हाला दाखवून दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आपल्यासाठी आदर्श असून शिवाजी महाराजांच्या विचारावर आपण चालल्यास नक्कीच राष्ट्राची उन्नती होईल. असे उद्गार या वेळी काढले.
      कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभलेले श्री मयुरजी लिखार यांनी सर्व युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील प्रेरक प्रसंग सांगून सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर  उद्बोधन केले. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या वंदनेने व आरतीने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोरवे सर यांनी केले. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन श्री बळीराम राठोड सर यांनी केले.कार्यक्रमाला विद्यालय तथा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments