Ticker

6/recent/ticker-posts

य.च. कला व विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती संपन्नम

मंगरूळपीर :-
 स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मध्ये दि. 23 फेब्रुवारी 2024 शुक्रवार रोजी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती दीप प्रज्वलन व प्रतिमेस हार अर्पण करून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरद  वाघोळे  तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.संजीव इंगळे , डॉ. साहेबराव पवार ,डॉ. विवेक आर मते, डॉ. अंजुम खान हे होते. संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर सर्व मान्यवरांनी सखोल असे मार्गदर्शक केले तसेच अध्यक्ष भाषणात डॉ. वाघोळे सरांनी स्वच्छतेच्या माध्यमातून गावाची घाण तसेच शिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या मनाची घाण कशाप्रकारे स्वच्छ करता येते हे गाडगेबाबांनी सांगितले त्याचा अंगीकार आपण करावे असे प्रतिपादन केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. चंद्रकांत उल्हे ,राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. सुषमा जाजू तसेच तालुका क्षेत्रीय समन्वयक डॉ.संजीव इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये व महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांच्या मदतीने मंगरूळपीर येथील बस स्थानकाची स्वच्छता करून बस स्थानकावरील जनतेस स्वच्छतेचा संदेश देण्यात  आले.याप्रसंगी आगार व्यवस्थापक श्री .मडावी साहेब (ए डब्ल्यू एस )श्री .तायडे साहेब (एटीआय )श्री .दीपक विटकरे (वाहतूक नियंत्रक )श्री. प्रकाश महल्ले ,सौ. सहारे मॅडम (वाहक) श्री .मस्के (लिपिक )यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यांनी सुद्धा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला व स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले आणि कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments