Ticker

6/recent/ticker-posts

शेलुबाजार जिल्हा परिषद शाळा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा - विद्यार्थ्यांमध्ये आनंद शाळा समिती अध्यक्ष प्रकाश अपूर्वा



शेलुबाजार वार्ता श्याम अपूर्वा :⁠- मंगरूळपीर तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा असून शताब्दी उत्सव तसेच सन्मानित शाळेच्या यादीमध्ये नाव असलेली जि प प्रायमरी शाळा येथे दि.22.04.24 रोज सोमवार रोजी नवीन पहिल्या वर्गात नावाची नोंद करून अनेक विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन देऊन स्वागत करून शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख व तसेच प्रमुख सुरेश राऊत सर होते व उद्घाटक म्हणून शाळा समिती अध्यक्ष प्रकाश अपूर्वा व तसेच सदस्य व पालक वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये व शाळेतील मुख्याध्यापिका सुशिला माघाडे मॅडम व शिक्षक  सर्वच कर्मचारी वर्गातून शाळा पूर्वतयारी मेळावा घेऊन अंगणवाडी महिला कर्मचारी यांनी येणारे विद्यार्थ्यांचे बलबुद्धी गुणवत्तेचे शिक्षण घेण्यासाठी मदत केली तसेच आकर्षक सजावट करून कार्यक्रम सुरू होण्या अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर. महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाई ज्योतिबा फुले.शाहू व इतर सर्वच महापुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून त्यांचे विचार आत्मसात करणे ही एक काळाची गरज आहे असे मत मुख्याध्यापिका सौ सुशील मांगडे मॅडम यांनी व्यक्त केले व कार्यक्रम सुरू करण्यात आले तसेच पहिल्या वर्गात नव्याने नोंद करून विद्यार्थी व तसेच पालक वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये हा शाळा पूर्वतयारी मेळावा घेवून विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य ते मार्गदर्शन केंद्र प्रमुख सुरेश राऊत सर यांनी दिले आणि अनेक पालक वर्गांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तसेच शाळा पूर्वतयारी मेळावा उत्सवामध्ये सर्वच शाळेतील कर्मचारी वर्गांनी अधिक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांची उजळणी व सुट्ट्यांमध्ये शिक्षण घ्यायचे याची पूर्व तयारी व मार्गदर्शन अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तसेच पालक वर्गांना सूचना देऊन हि शाळा पूर्वतयारी मेळावा उत्सव साजरा करण्यात आला. 

उत्सवामध्ये सर्वांनी नरेश देशमुख मंगेश गिरी हर्षल इंगोले शीला कोकरे मनीषा खामकर व इतर कर्मचारी उपस्थित राहून सहभाग दर्शविल्याबद्दल व तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून शाळा पूर्वतयारी घेवून हा उत्सव साजरा करण्यात आला त्याबद्दल शाळा समिती अध्यक्ष प्रकाश अपूर्वा यांनी आनंद व्यक्त केला.
सूत्रसंचालन हर्षल इंगोले सर तर आभार मंगेश गिरी यांनी मानले आणि कार्यक्रम संपन्न झाले असे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments