Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर येथे नगराध्यक्ष यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

मंगरुळपीर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)च्या वतीने मंगरुळपीर शहरात उभारण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला.

नगरपरिषद मंगरुळपीरचे नगराध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ महादेवराव परळीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री तथा कृषिमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सोनाई कॉम्प्लेक्स, महात्मा ज्योतिबा फुले चौक, मंगरुळपीर येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपरिषद सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या व विविध प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचा पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

शहरातील विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर प्रभावीपणे पाठपुरावा करणे यासाठी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगण्यात आले.

उद्घाटन सोहळ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मा. श्री. अशोकभाऊ महादेवराव परळीकर यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments