Ticker

6/recent/ticker-posts

तिकीट का कापलं? याचं उत्तर माझ्या नेत्यालाचं कळलं नाही- भावना गवळींनी स्पष्टच सांगितलं

उमेदवारी कापण्याबद्दल कार्यकर्ते मला विचारतात, असे भावना गवळीं म्हणाल्या
आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगत पाहायला मिळणार आहे. दोन्हीकडे 3 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आल्याने जागापाटपावेळी वरिष्ठांची त्रेधातिरपीट उडाली. यानंतर काहींना राज्यसभेचे आश्वासन तर दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अशा अनेक गोष्टी कराव्या लागल्या. असाच प्रकार वाशिम-यवतमाळ मतदार संघात पाहायला मिळाला. भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार जनमत नसल्याने भावना गवळींना येथून उमेदवारी नाकारण्यात आल्याचे बोलले गेले. याबद्दल भावना गवळींना विचारण्यात आलं. यावर त्यांनी केलेल्या विधानामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलंय. काय म्हणाल्या भावना गवळी? जाणून घेऊया.

वाशिम-यवतमाळच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ वाशिम शहरात शिवसेना सवांद मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नीलम गोऱ्हे, खासदार भावना गवळी, हेमंत पाटील आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

माझी उमेदवारी कापवी याची मला खंत आहे. माझी एक झाशी गेली एक किल्ला गेला असेल तरी काही हरकत नाही. इतर किल्ले लढवीन. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा काही वेळा एक पाउल मागे यायचे. 

Post a Comment

0 Comments