Ticker

6/recent/ticker-posts

बोलेरो पिकअपची उभ्या ट्रकला धडक समृद्धी महामार्गावरील घटना



शेलुबाजार वार्ता :⁠- नाशिक येथून नागपूरच्या दिशेने द्राक्षाची वाहतूक करणाऱ्या भरधाव बोलेरो पीकअप वाहनाने उभ्या ट्रकला मागुन जोरदार धडक दिली. या घटनेत दोन जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना ७ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील लोकेशन २०६ शेंदुरजना मोरे नजीक घडली. 

प्राप्त माहितीनुसार नाशिक येथून नागपुरच्या दिशेने द्राक्षाची वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन(एम.पी.२० जि.बी ६५८८) भरधाव वेगाने जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर (डब्ल्युबी ३४ ई ९९५९) धडकले. या घटनेत बोलेरो पिकअप वाहनाच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. तसेच त्यातील राजा बेहरीलाल अहिरीवाल ( २२) व घनश्याम पटेल (२४, दोघेही रा. दमु, उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाले. ही धडक एवढी भीषण होती की अपघातानंतर ट्रक पलटी झाला व बोलेरो मधील दोघेही वाहनात अडकून पडले होते.अपघाताची माहिती ही शेंदुरजना मोरे येथील शेतकऱ्यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांना दिले. त्यांनी तात्काळ समृद्धी १०८ लोकेशन कारंजा व शेलुबाजार यांना अपघाताची माहिती दिली. व तात्काळ १०८ शेलुबाजार पायलट खिल्लारे व डॉ सैफुद्दीन व कारंजा लोकेशन १०८ पायलट विधाता चव्हाण व डॉ भास्कर राठोड यांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली. अग्निशमन दल व पोलीस विभागाने मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढले. त्यांना १०८ रुग्ण वाहिकेतून कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मस्के यांनी प्रथमोपचारानंतर जखमींना अमरावतीला रेफर केले. अपघातानंतर समृद्धी महामार्गावर ट्रक मधील कांदा व पिकप वाहनांमधील द्राक्ष अस्ताव्यस्त पडले होते.

Post a Comment

0 Comments