Ticker

6/recent/ticker-posts

ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर यांना तात्काळ मुख्यालयी जमा करा !भाजपा पदाधिकारी मारहाण प्रकरण : खंडाळकर यांचा आत्मदहनाचा इशारा


वाशिम - वाशिम यवतमाळ लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारासाठी शहरात आलेले सिने अभिनेता यांच्या रोडशो दरम्यान भाजपाचे सरचिटणीस गणेश खंडाळकर यांना अश्लिल शिवीगाळ व मारहाण प्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना तात्काळ मुख्यालयी जमा करण्यासह त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी खंडाळकर यांनी तीव्र आंदोलनासह १० मे रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात २९ एप्रिल रोजी खंडाळकर यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, महायुतीचे उमेदवार सौ. राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेता गोविंदा यांचा १३ एप्रिल रोजी शहरात रोड शो काढण्यात आला होता. या रोड शो दरम्यान स्पीकर लावण्याच्या कारणावरुन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर यांनी अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस गणेश खंडाळकर यांनी केला आहे. यासंदर्भात खंडाळकर यांनी १५ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देवून ठाकुर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमि नसतांना तसेच एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी असतांना ठाणेदार ठाकुर यांनी माझ्यासोबत केलेली वर्तणूक ही अशोभनिय आहे. त्यामुळे या मारहाण प्रकरणी ठाणेदार ठाकुर यांना तात्काळ पोलीस मुख्यालयी जमा करुन त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा ठाकुर यांच्याविरोधात आंदोलन उभे करण्यात येईल. आंदोलना नंतरही कारवाई न झाल्यास येत्या १० मे रोजी आत्मदहन करण्यात येईल. व याला सर्वस्वी ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर हेच जबाबदार राहतील, असे खंडाळकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनाव्दारे नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, पोलीस महासंचालक व अमरावती पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत.

युवा पिढी व्यसनाच्या खाईत , गुटखा माफी यावर प्रशासनाचे दुर्लक्ष

Post a Comment

0 Comments