महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वाशिम जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 15 जुलै 2024 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दि 11 जुलैपासून टप्प्याटप्प्याने सदर आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी महाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शासनाने महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर केलेला नाही, अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार पदावर देण्यात येणारी पदोन्नती थांबवली आहे, महसूल सहाय्यक यांचे वेतन स्तर वाढविणे, सेवा नियमित होण्यासाठी महसूल सहायक यांना दोन अर्हता परीक्षा द्याव्या लागतात. इतर विभागात मात्र एकच परीक्षा तर काही विभागात तर कोणतीच परीक्षा द्यावी लागत नाही, नायब तहसीलदार यांची वेतनश्रेणी वाढवून देण्यात यावी, कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे प्राधिकार पत्रावर काढण्याकरिता शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, नियमित सेवा व पदोन्नतीसाठी एकच परीक्षा पद्धत वापरावी, अव्वल कारकून या पदाचे नामांतरण करून सहाय्यक महसूल अधिकारी करावे, महसूलचा सुधारित आकृतीबंध मंजूर होईपर्यंत पुरवठा विभागातील रिक्त पदे भरण्यात येऊ नये, शिपाई कर्मचाऱ्यांना तलाठी संवर्गात 25% पदोन्नती देण्यात यावी, आधी महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे जोपर्यंत सदर मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे अशी सर्व महसूल कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. दरम्यान शासनाने तातडीने सदर मागणी मान्य न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सदर आन्दोलनाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. सदर आंदोलनात कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि महाले, कोषाध्यक्ष रवी अंभोरे, सचिव सचिन भारसाकळे, उपाध्यक्ष संदीप काळबांडे, गजानन देशमुख, महसूल कर्मचारी श्री वाडेकर, श्री साळसुंदर, श्रीराम गवई, श्री आवटे श्री समाधान शेरे, अतुल देशमुख श्री गरुड श्री अनिल घुगे श्री प्रमोद वानखेडे अमित चव्हाण रवी दुबे संतोष वंजारे गजानन उगले ज्ञानेश्वर अवधूत अनंता रोकडे आनंद आरु दत्ता धनगर श्रीकांत वडोदे श्री शरद भाग्यवंत गजानन कुराडे श्री नालट माधवराव शिंदे शंकर शिंदे धनंजय कांबळे संदीप ठाकरे विनोद मारवाडी सचिन मोरे सतीश माडेवर विनोद पाचपिल्ले संतोष बैरवार श्री खंडारे अमित किल्लेदार रंजित चव्हाण किशोर खाडे विनायक केंद्रे श्रीमती सीता राऊत शितल ठोकळ सुवर्णा सुर्वे रचना परदेशी, श्रीमती देशमुख, रंजना अडकिने, इत्यादी महसूल कर्मचारी उपस्थित कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments