आकांशा ऑर्गनायझेशन तसेच आकांक्षा इंटरनॅशन स्किलआणि स्कूल, कौशल्य उद्योग विकास रोजगार केंद्र यांच्या मार्फत भव्य रोजगार आणि स्वयंरोजगार मेळावा २०२४ भरवण्यात आला होता. प्रथम दिवशी ५ जुलै मुलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला कंपनीज ९० आणि रजिस्ट्रेशन २००० पेक्षा जास्त कॅंडिडेटचे झाल्यामुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी ६ जुलै ला सुद्धा हा मेळावा घ्यावा लागला दुसऱ्या दिवशी सुद्धा 500 मुलांचे रजिस्ट्रेशन होऊन मेळाव्यामध्ये भरगोस मुलांनी प्रतिसाद दिला होता. कंपन्यांच्या पण रिक्त पदे बऱ्याच होत्या आणि जवळजवळ २०० ते २५० मुलांना रोजगार देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. काही कंपन्यांनी अपॉइंटमेंट लेटर देऊन मुलांना कंपनीमध्ये बोलवले आहे आणि तिथे इंटरव्यू घेऊन त्यांच्या योग्यतेनुसार ऑफर लेटर देतील.
या रोजगार मेळाव्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली खूप कंपन्यांकडून रिक्वायरमेंट असताना पण एज्युकेशन क्वालिफिकेशन मुलांचं भरपूर प्रमाणात आहे मास्टर डिग्रीज असून सुद्धा मुलांना जॉब मिळत नाही रोजगार उपलब्ध होत नाही याच्या मागचे कारण असे हे त्यांच्यामध्ये कौशल्य विकासाचे प्रमाण फार कमी आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना काउंसलिंग करून आम्ही कौशल्यावरती त्यांना भर देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत आणि त्यांनी स्वतःचं कौशल्य वाढवावं आणि आपल्या करिअरला वेगवेगळ्या संधी द्याव्या अशी कंपन्यांनी आणि स्वतः आकांक्षामार्फत आम्ही ही विनंती मुलांना केलेली आहे आणि मुलांना त्याच्या मार्फत आपण एम्पॉवरमेंट देत आहोत.यूथस्टार्टअप मार्फत आपण कौशल्य विकासाचे वेगवेगळ्या स्तरातून काम करत आहोत तसेच वेगवेगळे कार्यक्रम आकांक्षा राबवत आहोत.
0 Comments