पत्रकार होणं म्हणजे केवळ हातात बूम-माईक घेऊन, प्रेसकार्ड दाखवत मिरवणं नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा, आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जगण्याच्या स्पर्धेत हेच
शिकायचे असते की जिंकलात
तर आवरता आलं पाहिजे. आणि
हरलात तर सावरता आलं पाहिजे.
मिञानो माध्यम कोणतेही असो,कंटेट महत्वाचा आहे......
मोठे वर्तमान पत्र, मोठे टि.व्ही चॅनल हातात असले किंवा मोठ्या पदावर काम करत असला म्हणजे तो रिपोर्टर किंवा पञकार मोठा होत नाही! तर आपली लेखणी व वाणी किती वस्तुनिष्ठ आहे. तो लिहणारा किती संवेदनशील आहे. त्याच लिखाण किती रोखठोक, निर्भीड, निष्पक्ष, आहे. यावरून वाचक, दर्शक, ठरवतात की तो पञकार किती मोठा आहे. कि मोठा म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे? हे महत्वाचे आहे!!! लिहणा-या ने किती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला. त्या बातमी मध्ये वस्तुनिष्ठता किती आहे. यावरच त्या पञकाराचे मूल्यमापन ठरत असते.आणी हे मूल्यमापन वर्तमान पत्र वाचणारा वाचक, टि.व्ही पाहणारा दर्शक, प्रेशक ठरवत असतो. केवळ जॉब करणे, जाहिरात मिळविणे , किंवा आपल्या फायद्यासाठी तोळी करणे किंवा इतरांना फसविणे म्हणजे पञकारीता नव्हे! त्यासाठी पञकारीतेचा पिंड असावा लागतो, तो हाडाचा पञकार असावा लागतो. नव्हे हाडाचा पञकार व्हावे लागते. ते उसने मिळत नाही,की विकत घेता येत नाही,तर पञकारीता ही रक्तात असावे लागते. जसे वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नसतो! जनावराचे हाड खाऊन कोणी हाडाचा पञकार होत नसतो! तसेच गळ्यात प्रेस कार्ड अडकवून कोणी पञकार होत नसतो! किंवा गाडीवर प्रेस लिहणारा खरा पञकारच असतो असे नाही! वाहनावर तर कोणीही प्रेस लिहतो किंवा लिहू शकतो! परंतु खरा प्रेस लिहणारा तोच,जो गुंडगिरी ला प्रेस करतो,अत्याचार करणा-या प्रवृत्तीला प्रेस करतो, समाजा-समाजात तेढ निर्माण करणा-या प्रवृत्तीला प्रेस करतो, भ्रष्टाचाराला प्रेस करतो, तरूण वर्गाला व्यसन लावणा-या, व्यसनाधीन बनविणा-या प्रवृत्तीला, शक्तीला प्रेस करतो. त्यानाच आपल्या गळ्यात प्रेस कार्ड लावण्याचा व गाडीवर प्रेस लिहण्याचा अधिकार आहे. सर्वसामान्यांसाठी लेखणी झिझवतो तो पञकार! समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडतो तो पञकार! समाजाचे प्रश्न व समस्या शासन दरबारी आपल्या लेखणीतून पोहचवतो तो पञकार! रंजल्या गाजल्याला न्याय मिळावा म्हणून लिहतो तो पञकार! समाजाचे प्रतिबिंब आपल्या लेखणीतून उमठवतो तो पञकार!समाजाच्या समस्या,प्रश्न,अन्याय,अत्याचार याचा आरसा बनतो तो पञकार! समाजाचा आवाज शासन दरबारी बुलंद करतो तो पञकार! लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मजबूत रहावा म्हणून झटतो, झपतो, काळजी घेतो, तो पञकार! वर्तमान पत्राच, पञकारीतेच पावित्र्य टिकून रहाव म्हणून जपतो तो पञकार! आपल्या वागणूकीने पञकारीतेला डाग लागू नये म्हणून शालीनता ठेवतो तो पञकार! आपल्या लेखणीतून शेवटच्या घटकापर्यंत शासनाकडून मिळणारे लाभ, अनुदान, योजना लाभार्थ्यां पर्यंत पोहचवतो,योजना विषयी जनजागृती करतो तो पञकार! पञकारीता हे सर्वसामान्य वर्गातील जनतेला त्याचे हक्क अधिकार व न्याय मिळवून देण्यासाठी हाती घेतलेल व्रत समजून लिहतो, वागतो,चालतो तो पञकार! सर्वसामान्यांवर होणा-या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडणारा पञकार! सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, असण्याबरोबर जनतेसाठी संवेदनशील मन असणारा पञकार! लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ मापदंडात बसणारा पञकार! फक्त आणी फक्त सर्व चांगले गुण संपन्न असणारा खरा पञकार! मिञ हो माझ्या तुटक्या-फुटक्या, वेड्या-वाकड्या शब्दात सर्वसामान्य जनतेला पञकार कसा अपेक्षित आहे.यावर माझ्या शब्दात, भाषेत व्यक्त केलेली अपेक्षा व प्रकाश टाकण्याचा केलेला प्रयत्न! क्रमश:........... लेखन-अण्णाभाऊ चौधरी चेहेल
पो.ता.मंगरूळनाथ जि.वाशिम.
0 Comments