Ticker

6/recent/ticker-posts

तहसीलदार मंगरूळपीर याना रास्त भाव दुकानदार यांनी दिले निवेदन

 


रास्त भाव दुकानदारांना माहे जुलै 2024 चे धान्य वाटपामध्ये आधार सर्वर सुरळीत करून देणे  तसेच माहे जुलै 2024 करिता धान्य वाटप ची मुदत वाढ करून देणे बाबत. देण्यात आले निवेदन मंगरूळपीर तालुक्यातील सर्वच दुकानदारांना होत असलेल्या अडचणी बाबत उपरोक्त संदर्भीय विषयावये, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ, वाशिम कडून विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की, "ऑल इंडिया फेयर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली" या देशपातळीवरील संघटोच्या वतीने रास्त भाव दुकानदारांच्या धान्य वाटप करण्याकरिता येणारे आधार सर्वर प्रॉब्लेम लवकरात लवकर सुरळीत करून माहे जुलै 2024 धान्य वाटपकरिता मुदत वाढ देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन दुकानदारांना मिळालेल्या ई-पॉस मशीनमध्ये विविध स्वरूपातील अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे धान्य वितरण प्रक्रिया ठप्प होऊन गरजूंना धान्य मिळेनासे झाले आहे. या समस्येमुळे रेशन दुकानदारही परेशान झाले असून दुकानदारांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर करून होत असलेल्या अडचणी  मांडून प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे . दुकानांना दोन महिन्यांपूर्वी '५-जी' नेटवर्क असणाऱ्या ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. नवीन मशीनमुळे धान्य वितरण जलद गतीने होईल, अशी अपेक्षा स्वस्त धान्य दुकानदार बाळगून होते; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. याउलट चालू महिन्यात वारंवार आधार सर्व्हर ठप्प होऊन ई-पॉस मशीन बंद राहत आहे. त्यामुळे रेशनधारकांना धान्य वितरण करणे अशक्य होत आहे. मागील दहा  दिवसांपासून ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

या त्रासाला कंटाळून मंगरूळपीर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष सुधाकर चौधरी , निलेश पाटील, सुधाकर भोगले,
एहतेशाम ,लहीक अहेमद, एस. एम. डोंगरे,पी बी गजो, पेंढारकर मॅडम, चारखोळ, डोंगरे , इंगोले, इत्यादी  धान्य दुकानदार यानी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्याची व सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.








 

Post a Comment

0 Comments