Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारीयानी मंगरूळपीर येथील ऑटोचालकांवर केली कारवाई


विद्यार्थी वाहतुकीचे सर्वच नियम धाब्यावर;जिल्हाधिकार्‍यांनी मंगरूळपीर येथील ऑटोचालकांवर केली आज सकाळी कारवाई


वाशिम:-वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. व सीईओ वैभव वाघमारे यांच्या वाहनाचा ताफा शासकीय कामासाठी आज सकाळी जात असतांना मंगरुळपीर शहरातुन विद्यार्थांची प्रवाशी वाहतुक बेकायदेशीररित्या सुरु असल्याचे दिसले.क्षमतेपेक्षा जास्त ऑटोमध्ये विद्यार्थ्यांना कोंबुन बसवले होते तसेच विद्यार्थ्यांचे दप्तरेही बाहेर लटकवलेले होते.अशा पध्दतीच्या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतु शकते यामधून मोठा अपघातही होऊ शकतो बस स्टँड परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन उभी असतात पायल हॉटेल समोर फळाच्या दुकानासमोर लक्झरी सारखी मोठी वाहने उभी असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालवा लागते आज हा प्रकार जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस . यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिला व   तात्काळ आपले वाहन मागे घेतले  गळ्यातील सुरक्षा कर्मचारी खाली उतरले सदर ऑटोचालकांना ताब्यात घेवुन कारवाईसाठी मंगरुळपीर पो.स्टे.ला सुचित केले.येथील ठाणेदार यांनी कारवाई करत इतरही ऑटोचालकांची बैठक घेवुन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सर्वांना सुचना दिल्या. सूचनाचे पालन न करणाऱ्या वर कारवाई केली जाणार असेही बजावले

वाशिम जिल्ह्यात व मंगरुळपीर येथे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन व चालक यांची पात्रता पाहिली, तर कोणालाच ही वाहतूक करण्याचा परवाना मिळू शकणार नाही, अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या वाहनांतून विद्यार्थी संख्येची क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 नुसार 12 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना 2 आसन क्षमता असणार्‍या सीटवर 3 विद्यार्थी व तीन आसन क्षमता असणार्‍या वाहनात चार विद्यार्थी इतकीच आहे. प्रत्यक्षात रिक्षात 12 ते 15 विद्यार्थी कोंबले जात आहेत. वर्षानुवर्षे ही वाहतूक कशी सुरू राहते, हा मोठा प्रश्न आहे.वाहनाची दैनंदिन देखभाल करावी.वाहनाचे डॅशबोर्डवरील सर्व मीटर कार्यरत असल्याची खात्री करावी.वाहनाची इंधन गळती, ब्र्रेक कार्यक्षमता, टायर्सची स्थिती नियमित तपासावी.बस लेनमधूनच प्रवास करावा.विद्यार्थ्यांची संख्या नोंदणीकृत क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 मध्ये विहीत केल्याप्रमाणे 12 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना 2 आसन क्षमता असणार्‍या सीटवर 3 विद्यार्थी व 3 आसन क्षमता असणार्‍या वाहनात 4 विद्यार्थी.

वाहनात विद्यार्थ्यांनी विसरलेले सामान शाळेमध्ये जमा करावे.योग्य थांब्यावर व शाळेतील आवारात विद्यार्थी वाहनात घेणे व उतरवणे.परिचर (मदतनीस) आवश्यक
प्रत्येक वाहनात परिचर (मदतनीस) असणे बंधनकारक आहे.जर वाहनात विद्यार्थिनी असतील, तर महिला परिचर (मदतनीस) असणे बंधनकारक आहे.विद्यार्थ्यांना उतरताना किंवा चढताना व रस्ता पार करताना वाहतुकीचे नियम पाळून मदत करणे.

वाहन चालवतानाची काळजी
वाहनाचा आरसा सुस्थितीत करावा.
सीटबेल्ट/हेल्मेट परिधान करावे.
योग्य इशारा करूनच वाहन रस्त्यावर आणावे.चौक पार करताना वेगावर नियंत्रण योग्य मार्गिकेची निवड
समोरील वाहनांना प्राधान्य
थांबा, पाहा व नंतरच पुढे जाणे आवश्यक
वाहनात प्रथमोपचार पेटी व पाच किलोचे एबीसी प्रकारचे 2 अग्निशामक यंत्र बसवावे.वाहनास स्पीड गव्हर्नर बसवणे बंधनकारक.शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या एकाही नियमाचे सध्या वाशिम जिल्ह्यात तसेच मंगरुळपीर शहरात पालन होत नसल्याचे उघड झाले आहे. रिक्षाचालकांविरोधातील कारवाईची मोहीम पुन्हा थंडावली आहे. त्यामुळे अडलेले पालक व विद्यार्थ्यांना रिक्षाचालकांच्या अरेरावीला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. पालकांची लूट करणार्‍या व विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांवर सातत्याने कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे. तसे झाले तरच विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकतील.
रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे
मुलाला शाळेत सोडणे प्रत्येक पालकाला शक्य होत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांवर भरवसा ठेवावा लागतो. एका रिक्षात अनेक मुले कोंबलेली असतात. प्रत्येक रिक्षाचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे मंगरूळपीर  येथील ठाणेदार सुधाकर आळे याणि सर्व ऑटो चालकांना बजावले आहे .

Post a Comment

0 Comments