महसूल कर्मचारी एकजुटीचा
विजय असो महसूल संघटनेचा विजय असो
महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी बंधू आणि भगिनींनो आपले सात दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज दिनांक 23-07-2024 रोजी मंत्रालय येथे बैठक पार पडली त्यामध्ये आपल्या आंदोलनाच्या संदर्भात आज माननीय महसूल मंत्री महोदयांसोबत असलेल्या बैठकीसाठी सर्व पदाधिकारी उपस्थित होते मात्र माननीय मंत्री महोदयांनी अति महत्त्वाच्या बैठकी असल्यामुळे सदरची बैठकी माननीय अप्पर मुख्य सचिव यांचे उपस्थितीत घेण्यात आली त्यावेळी मंत्रालयीन आपल्या मागण्या संदर्भातील सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते त्यावेळी आपली मुख्य मागणी आकृतीबंध याबाबत मा. अपर मुख्य सचिव यांनी दं दांगट समितीचा अहवाल आहे तसा स्वीकारण्यात येत असून लवकरात लवकर त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल व त्याबाबत संबंधित कार्यासनाने कार्यवाही चालू केलेली आहे. त्याचप्रमाणे अव्वल कारकून या पदाचे पदनाम सहाय्यक महसुल अधिकारी करण्याबाबत शासनाने सामान्य प्रशासन विभागाकडे निर्णयासाठी नस्ती सादर केलेली आहे. त्याचबरोबर इतर मागण्यांबाबत देखील संबंधित विभाग प्रमुख यांना सूचना दिलेल्या असून त्याबाबतचे सर्व फाईल कार्यवाहीत असल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले व त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे माननीय अपर मुख्य सचिव साहेब यांनी सांगितले
अव्वल कारकून संवर्गाच्या वेतन तुटी संबं तिची नसती वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेली आहे त्यामध्ये लवकरच सकारात्मक निर्णय होणार विभागीय दुय्यम सेवा व महसूल अर्थ परीक्षा बाबत दोन्ही परीक्षा मिळून एकच परीक्षा घेण्याबाबत नस्ती तयार करणयात आली आहे त्यामध्ये लवकरच निर्णय घेण्यात येईल असावं सांगितले आपल्या निवेदनातील मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्याबाबत मा. सचिव यांनी सांगितले त्याचबरोबर संध्याकाळी 7 वाजता मा. महसूल मंत्री महोदय यांचे सोबत देखील संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली असून मा. मंत्री महोदयांनी देखील सर्व मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे तसेच संपामध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांचा कोणत्या प्रकारे पगार कापला जाणार नाही याबाबत आश्वस्त केले वरील प्रमाणे घटना क्रमांक शासन दरबारी झालेल्या सकारात्मक चर्चा नुसार आपला मागील सात दिवसापासून सुरू असलेला काम बंद आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे तरी सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी यांनी आपल्या कामावर हजर होऊन सात दिवसातील प्रलंबित राहिलेले कामकाज पूर्ण करण्याकडे प्राधान्य द्यावे आपण संघटने प्रति व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांप्रती दाखवलेला विश्वास हा असाच ठेवून यापुढे सुद्धा आपल्या प्रलंबित राहिलेल्या काही मागण्या मान्य करण्यासाठी संघटना जी भूमिका घेईल त्यात आपण साथ द्यावी जेणेकरून आपल्या सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींच्या प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित राहिलेल्या मागण्या टप्प्याटप्प्याने आपल्याला शासन दरबारी पाठपुरावा करून मान्य करून घेता येतील व त्या अनुषंगाने आपल्या कर्मचारी बांधवांच्या समस्यांचे निराकरण होईल सर्व राजकारणी सभासद विभागीय अध्यक्ष पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सरचिटणीस व इतर पदाधिकारी यांना अवगत करण्यात येते की आपण पुकारलेले काम बंद आंदोलन हे आज संध्याकाळपासून स्थगित करण्यात येत आहे तरी उद्यापासून सर्वांनी कामावर हजर होण्याबाबत सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी व आपली नियमित कामकाज करावे आजच्या घटना क्रमाबाबत अतिरिक्त माहिती पत्रकार द्वारे पाठवण्यात येईल
0 Comments