Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे शासनाच्या आर्थिक सहकार्यातून महिलांची उद्योगविश्वात भरारी

वाशिम - कुटुंबाचे व्यवस्थापन सक्षमपणे सांभाळणार्‍या महिला ह्या पुरुषाप्रमाणेच कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत किंबहूना त्याही पुरुषाच्या बरोबरीने कोणताही व्यवसाय यशस्वीरित्या करु शकतात ही बाब कारंजा येथील समिक्षा महिला बचत गटातील महिलांनी सहकार क्षेत्रातून उद्योगविश्वात आत्मविश्वासाने पाऊल टाकून सिध्द केले आहे. या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला शासनाची खंबीर साथ त्यांना मिळाली आहे.
  माविमव्दारा संचालित अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राच्या सहकार्याने कारंजा येथील समिक्षा महिला बचत गटाच्या माध्यमातून शुक्रवार, १९ जुलै रोजी तेजस्विनी आटा निर्मिती व प्रक्रिया उद्योग केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम नविन बायपास जवळील माणकनगर येथे उत्साहात पार पडला. केंद्राचे उद्घाटन माविमचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांनी फित कापून केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, बँक ऑफ महाराष्ट्र कारंजाचे शाखा व्यवस्थापक राहुल मुठाळ ,बँक ऑफ इंडिया कारंजाचे शाखा व्यवस्थापक गणेश धांडे, माविमच्या कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके, गुरुदेव सेवाश्रमाचे संचालक सुनिल दशमुखे, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे उपस्थित होते. 

केंद्राच्या उद्घाटनानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महिला बचत गटाच्या भगीनींनी सर्व मान्यवरांचे आणि शेतकरी व वितरकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सहर्ष स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले. तदनंतर विद्युत स्विच दाबून तेजस्विनी आटा निर्मिती केन्द्राचे उद्घाटन करण्यात आले व मान्यवरांना प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. उद्योजिका सौ. छाया गावंडे यांनी प्रास्ताविकातून मनोगत व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शनात बोलतांना केशव पवार म्हणाले की, कारंजा येथील बचत गटाच्या माध्यमातून समिक्षा बचत गटाने घेतलेली उद्योगविश्वातील भरारी निश्चितच कौतूकास्पद आहे. माविमने बघितलेले महिला उद्योजक बनविण्याचे स्वप्न आज या समिक्षा बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण होतांना दिसत आहे. तर राजेश नागपूरे म्हणाले की, बचत गटाद्वारे तेजस्विनी आटा निर्मिती केन्द्र उभारणी म्हणजे महिलांची प्रगतीकडे चांगली वाटचाल होत आहे. त्यामुळे भविष्यात महिलांना वेळोवेळी लागणारे संपूर्ण सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमाला व्यवस्थापक शेखर खोडवे, सचिव सौ. अंजली फुरसुले, कोषाध्यक्ष प्रज्ञा मेश्राम व बहुसंख्य महिला मंडळीची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचलन व्यवस्थापक विजय वाहने यांनी तर समारोपीय आभार सौ. छायाताई गावंडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments