सगळ्यात आधी काही मूलभूत गोष्टी समजून घेऊ समाजसेवेचा कार्य करणाऱ्या माजी जि.प अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द, हातोली , पाळोदी , रुद्राळा , शेंदुर्जना आढाव , गिरोली , कोल्हार ,रुही , विळेगाव , या गावांना भेटी दिल्या जनसामान्यांचे प्रश्न समजून घेत तालुक्यातील नागरिकांना काय समस्या आहेत त्या जाणून घेत मंजूर झालेल्या घरकुलाच्या समस्या घरकुलाचे प्रश्न घरकुलांचे पैसे वेळेत न मिळणे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत सविस्तर चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याचे काम तसेच , शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे आपल्या पिकाचा विमा उतरवला होता. मात्र खरीप मधील नुकसानी होऊन सुद्धा काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अनेक शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम पिक विमा कंपनीने केलेआहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे .
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्थीही घालण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यातील महिलांनी तहसिल कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. अर्ज घेण्यासाठी या महिलांची धडपड सुरू असलेली पाहायला मिळत आहे. गावागावात या योजनेची चर्चा सुरू झाली आहे. महिलांना या बाबीचे अडचण जाऊ नये म्हणून माजी जि.प अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे मानोरा तालुक्यातील अनेक समस्या या मतदारसंघातील लोकांच्या आहेत त्यासाठी अधिकाऱ्यांना बोलून त्यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याचं काम
करत आहे. जनसामान्यांची समाजसेवा करणाऱ्या माजी जि.प अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे यांच्या कार्याला ग्रामीण भागातील जनसामान्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. व प्रशासनातील अधिकारी सुद्धा सहकार्य करत असल्याचे जनसामान्यात बोलले जात आहे.
0 Comments