मंगरूळपीर :-- थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विपुल प्रमाणात साहित्य संपदा निर्माण केली असून त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू हा शोषित - पीडित , उपेक्षित माणूस होता . अशाच माणसांच्या वेथा , वेदना त्यांनी आपल्या लेखनाचा विषय बनविला . त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने पेटून उठलेल्या माणसांना एकप्रकारे लढण्याचं मिळते , असे प्रतिपादन वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले . अण्णाभाऊ साठे यांच्या मंगरूळपीर येथील १ ऑगस्ट रोजी झालेल्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेकीबाळी अब्रूरक्षा संघटनेचे मुख्य संयोजक तथा सामाजिक व राजकीय घडामोडीचे विश्लेषक गंगाधर कांबळे हे होते . कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अण्णाभाऊंना समजून घेण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाची जास्त गरज असल्याचे म्हटले . प्रमुख अतिथी असलेल्या वाशिमच्या माजी जि. प. अध्यक्षा सोनाली जोगदंड - लांडगे , माजी पं स. सदस्य विनोद जोगदंड , युवा सामाजिक कार्यकर्ते दिपक भालेराव , समाजसेवक संजूभाऊ आधारवाडे , सौ. इंद्रायणी नितेश पिसोळे यांनीही विचार मांडलेत . मातंग समाजातील युवती प्रा. डॉ. कु. सोनालीताई इंगळे यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा समाजातील उच्चविद्याविभूषित सुनंदाताई भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाशिम जिल्हा संघचालक दादासाहेब ढोबळे , माजी सभापती भास्कर पाटील शेगीकर , मंगरूळनाथ ता. संघचालक किशोरभाऊ घोडचर , आर. के. रोठोड , रा.स्व. सं. चे ता. सहकार्यवाह संजूभाऊ टोंचर , समरसता मंचचे ता. संयोजक डिगांबर आमटे आदिंची प्रमुख उपस्थिती होती . या प्रसंगाची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नुकतेच महायुती सरकारने मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टीची निर्मिती केली व सर्वोच्च न्यायालयाने अण्णांभाऊंच्या जयंतीदिनीच अनुसूचित जाती अबकड वर्गीरणाला मान्यता दिली त्याबद्दल महायुती सरकार व सर्वोच्च न्यायालय यांच्या अभिनंदनाचा ठराव या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी मांडून तो सर्वानुमते पारित करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर तायडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर णपुरस्कारप्राप्त भगवानराव पिसोळे यांनी केले . या कार्यक्रमासाठी संपूर्ण मंगरूळपीर तालुक्यातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments