Ticker

6/recent/ticker-posts

साहेब खरंच लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का,? अश्विनी अवताडे



    मंगरूळपीर येथील सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर महिलांच्या उत्थानासाठी सतत कार्य करत असणाऱ्या समाजसेविका अश्विनीताई अवताडे यांनी सध्या मा.मुख्यमंत्री साहेब यांनी लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये मानधन देण्यासाठी लाडकी बहीण नावाने योजना काढली परंतु साहेब खरंच तुमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाही आहेत.                      .  .       . कारण दिवसान दिवस महिला आणि मुलींना एखाद्या बाहुल्याप्रमाणे खेळ मांडून मोडतो केल्या जाते त्यामुळे त्या खरच सुरक्षित आहेत का असाही प्रश्न मनामध्ये घर करून बसला म्हणून मुलींनी आणि महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या संरक्षणासाठी लढा उभा करा असे सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई राम औताडे यांनी मत मांडले आहे.                          समाजात वावरत असताना प्रत्येक महिलेने मुलीने आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी तयार असले पाहिजे,  महाराष्ट्र मध्ये नुकत्याच दोन घटना घडल्या त्या अत्यंत क्रूरपणे त्यामधून प्रत्येक महिलेने मुलीनी शिकलं पाहिजे की कशा पद्धतीने आपला घात होऊ शकतो देशात अशा अनेक घटना घडतात तसेच महाराष्ट्रात पण रोज नवीन नवीन घटना घडत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये दोन घटना घडल्या एक त्यामध्ये एक घटना मंदिरा मध्ये एक महिला घरी वादविवाद झाल्यामुळे रागात निघून जाते आणि मंदिरात आसरा घेते पण तिथे ही कुठल्याही गोष्टीची कल्पना नसताना तिथे खाण्या मधून तिला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून त्या महिले वर एक नाही दोन नाही तर तीन पोटभऱ्या मंदिरातील पुजाऱ्यांनी  अत्याचार बलात्कार करून तिचं जीवन संपवलं आणि आपले बिग फुटु नाही म्हणून तिला कृरपणे तीला मारून टाकतात. मंदिरात ही महिला सुरक्षित नाहीये काय गलती होती तिची दुसरी घटना एक 22 वर्षाची मुलगी चार वर्षाच्या अगोदर एका मुला सोबत बोलत होती पण नंतर बोलणं बंद केलं आणि ते मनात राग धरून आता तिचा अत्यंत कुरुपणे खूण करून तिला फेकून देण्यात आले तिच्या शरीराचे काही अवयव पण कापून टाकण्यात आले काय वेदना  होत असतील तीला.. अत्यंत अशा भयानक घटना आहेत अशा कितीतरी घटना घडतात काहीच समोर येतात.. घटना घडल्यानंतर खूप लोक  प्रतिक्रिया देतात पण बंदोबस व्हायला पाहिजे तसा होत नाही त्यामुळे वारंवार वारंवार त्या घटना घडत असतात कायद्याची भीती नाही अनेक कायदे असून पण कुठल्याही प्रकारची शिक्षा लवकर होत नाही त्यामुळे गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत. कुठे अशी घटना घडल्या नंतर त्या गुन्हेगारावर लगेच कठोर कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा  जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कायद्याची भीती कोणाच्या मनात बसणार नाही. तसेच प्रत्येक महिलेने मुलीने कुठे ही वावरताना सावधगिरीने वावरले पाहिजे कोणावर ही विश्वास न ठेवता कोणी ही दिलेले पदार्थ सारासार विचार करून च घ्यावे तसेच कोणा ही सोबत मुलींनी मैत्री करायच्या पूर्वी सतसत विवेक बुद्धीने विचार करावा की या मुलाच्या, माणसाचा नंतर भविष्या मध्ये आपल्याला व  आपल्या कुटुंबाला कुठल्या ही प्रकारचा त्रास नाही होणार  ही गोष्ट बघा नंतर च विश्वास ठेवा..lकोणावर ही विश्वास ठेवू नका. हे बघा सगळ्या गोष्टी पेक्षा महत्त्वाचे असतआपण आणि आपले कुटुंब यापेक्षा कोणीही महत्त्वाचं नाही हा विचार सतत आपल्या मनात ठेवून आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे.         यासाठी प्रत्येक आई-वडिलांनी मुलींना इतर क्लास लावण्या बरोबरच कराटे क्लास व संरक्षणासाठी  काय करता येईल या गोष्टी सगळ्या घरूनच शिकवाव्यात जेणेकरून कोणती मुलगी एकटी जरी बाहेर पडली तरी ती तिचे संरक्षण करू शकेल. तसेच महिला आयोगाने यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी. अशा घटना घडूच नाही यासाठी उपाययोजना करावी. तसेच मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की इतर कोणत्याही महिलांना योजना देण्यापेक्षा तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या राज्यात सुरक्षित नाही आहेत त्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी आणि आमच्या महिला मुलींना सुरक्षित वातावरण तयार करावे जेणेकरून आमच्या कोणाही  महिलेचा व मुलीचा बळी जाणार नाही. सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने ही विनंती.  Concealer, motivational speaker.

Post a Comment

0 Comments