श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा (खुर्द )येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा "जन्मदिन" राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.अंजली धानोरकर मॅडम यांनी स्वीकारले तर प्रमुख अतिथींचे स्थान श्री. झळके सर सौ.होले मॅडम यांनी स्वीकारले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली. वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांनी "स्वयंशासन दिन"म्हणून शिक्षकाच्या भूमिकेत वर्ग 5 ते 9च्या विद्यार्थ्यांना "अध्यापन" करण्याचे कार्य केले व शेवटी त्यांनी दिवसभर केलेल्या अध्यापनाबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.प्रमुख अतिथी श्रीझळके सर व सौ होले मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन बहुमोल असे मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ अंजली धानोरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक कसा असावा. शिक्षक हा ज्ञानिवंत असावा व त्याने ज्ञानदानाचे पवित्र कार्य अखंड चालू राहावे व विद्यार्थ्यांनी ते ज्ञानग्रहण करावे अशा आशयाचे बहुमोलअसे मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला श्रीधानोरकर आदर्श विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 10 ची विद्यार्थिनी कु.रागिनी भगत हिने तर आभार कु. समिता भगत हिने मानले
0 Comments