मंगरूळपीर-यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळा आणि रा. से. यो. अंतर्गत पोषक आहार महा चे औचित्य साधून पोषक आहाराचे महत्व आणि विविध अवस्थेतील आहार
कार्यक्रम दिनांक-26/09/2024 गुरुवार रोजी संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एच. कान्हेरकर , प्रमुख अतिथी डॉ. ए .एच. शिंदे ,प्रा. नम्रता धनजकर तसेच समन्वयक प्रा. सौ. एस. एस. जाजू उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रतिमा पूजन व हार अर्पण करण्यात आले व सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पोषक आहाराचे महत्त्व याविषयी समन्वयक प्रा. एस. एस. जाजू यांनी पोषक आहाराच्या सर्व घटकांविषयी जनतेमध्ये विशेषतः मातांमध्ये जागृती निर्माण करणे असे प्रतिपादन केले ,तसेच प्रमुख अतिथी डॉ. शिंदे यांनी पोषक आहारामुळे हानिकारक रोगजंतू व विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती प्राप्त होऊन ,रोगापासून संरक्षण मिळते असे प्रतिपादन केले
तसेच प्रा. नम्रता यांनी आहाराद्वारे मानवाला शक्ती व आवश्यक पौष्टिक घटकांची प्राप्ती होते असे प्रतिपादन केले. यानंतर बी.ए .भाग २ चे चैताली पाकधने व आचल चव्हाण यांनी पूर्व शालेय अवस्थेतील आहार ,भक्ती सुर्वे व शिवानी मोरे यांनी शालेय बालकांचा आहार ,वृषाली ठोंबरे व कल्याणी पाकधने यांनी प्रौढावस्थेतील आहार, निकिता भगत व अनामिका इंगोले यांनी वृद्धावस्थेतील आहार इ. अनेक अवस्थेबद्दल आहार सादर केले तसेच अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ. कान्हेरकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले तसेच अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे .प्रत्येक जण अन्नाचे सेवन करतो ,बहुतेक लोक त्याचा आनंद घेतात. आहाराद्वारे मानवाला शक्ती व आवश्यक पौष्टिक घटकांची प्राप्ती होते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन अश्विनी फड व प्रणाली भोयर यांनी तर आभार गौरी ठाकूर यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता वैष्णवी महल्ले,साक्षी पवार, गायत्री बुरे,ज्ञानेश्वरी महल्ले, प्रणाली इंगोले ,नम्रता बुरे ,स्वाती भगत ,वैष्णवी ठाकरे ,रोशन आव्हाळे, यश सुर्वे इ. अनेक विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले . कार्यक्रमांमध्ये 80 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.
-------------------------------
0 Comments