Ticker

6/recent/ticker-posts

श्री वसंतराव नाईक महाविद्यालयात जागतिक मानवी अधिकार दिन संपन्न


 मंगरूळपीर : स्थानिक श्री. वसंतराव नाईक कला श्री. अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ.राठोड साहेब व प्राचार्य डॉ.एस. एम.वडगुले यांच्या मार्गदर्शनात जागतिक मानवी अधिकार दिन नुकता संपन्न झाला. या प्रसंगी सर्व प्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका अकोला येथील आर.डी.जी. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्या डॉ.सोनल टी. कामे मॅडम उपस्थित होत्या. व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस एम.वडगुले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी आर.तायडे यांनी केले. मार्गदर्शन करताना डॉ.सोनल कामे म्हणाल्या कीं जगभरातल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी युनो ने एक घोषणापत्र जाहीर केले. या वर्षाची आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवसाची थीम आहे. मानवा मधील असमानता कमी करणे व मानवी हक्क अधिक प्रगत करणे असून सर्व मानव मुक्त आहे. त्यांच्या सन्मान  आणि अधिकारांमध्ये समानता आहे. असे मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय  भाषणात डॉ.सुभाष वडगुले यांनी मानव अधिकार   हा जगभरातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.त्यामुळे कोणालाही मानवी अधिकार नाकारता येणार नाही. असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख डॉ.सुनील राठोड,डॉ. शृंगारे, डॉ.सुचिता माने मॅडम उपस्थित होत्या.व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्ये विध्यार्थ्यांची उपस्तिथी लाभली. या कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभाग  प्रमुख डॉ.पी. आर.तायडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments