वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पंचकोशीतील प्रसिद्ध असलेले पितांबर महाराज यांचे गावं कोडोली गावचे सुपुत्र अमोल पाटणकर यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) म्हणून नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त ओएसडी यांनी मुख्यमंत्री यांची मंत्रालयात भेट घेऊन आभार मानले.
यापूर्वी उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आरूढ असताना सुध्दा अमोल पाटणकर हे त्यांचे ओएसडी म्हणून नियुक्त होते. त्यावेळी पाटणकर यांनी संपूर्ण जिल्हयातील विविध विकास कामे मार्गी लावली होती. त्यांची पुन्हा मुख्यमंत्री यांचे ओएसडी (OSD) पदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. निपक्षपाती केलेले कार्य यावेळी निवडणुकी काळात संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खूप मोलाचे काम केले पाटणकर यांनी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली असल्यामुळे त्यांच्या या कार्याला यश आले आहे हे सत्य नाकारून चालता येणार नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे यासाठी सुरुवातीच्या काळापासून तर शेवटपर्यंत जिद्दीने व चिकाटीने कार्य केल्याची ही पावती असल्याचे आज दिसून येत आहे.
0 Comments