Ticker

6/recent/ticker-posts

आय. एन. एस शिवाजी व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने " नेव्ही डे " होणार साजरा

प्रतिनिधी श्रावणी कामत 

लोणावळा - आय. एन. एस. शिवाजी व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ. बी. एन. पुरंदरे ग्राउंड ला "नेव्ही डे " साजरा करण्यात येणार आहे. या वेळी पत्रकारांशी चर्चा करताना लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्री अशोक साबळे म्हणाले आर्मी नेव्ही फोर्स मुळे मुलांना चांगले अधिकारी बनण्याची संधी मिळते. जी शिस्त ज्याने राष्ट्र मोठ होत. त्या आर्म फोर्सची शिस्त मुलांना पाहायला मिळेल आणि त्याच अंतर्गत एक इंडियन नेव्ही बँड कॉन्सेप्ट च आयोजन केल आहे त्यात आर्म फोर्सची माहिती मुलांच्या करिअर साठी चांगले क्षेत्र आहे.. या कार्यक्रमास आय. एन. एस चे स्टेशन कमांडर श्री समीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि आर्म फोर्स चे अधिकारी येणार आहेत. आपला देश आणि देशाचे संरक्षण करणारे संरक्षण दला चा सार्थ अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे. ही भावना मुलांमध्ये यावे हे प्रयत्न 
लोणावळा म्युनसीपल कौन्सिल तर्फे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी शहरातल्या सर्व नागरिकांना सन्मानीय सदस्यांना, आर्म फोर्स च्या एक्स ऑफिसर आणि सर्व पालकांना व त्यांच्या पाल्याना आहवान केले या कार्यक्रमाचा एक भाग व्हा आणि  या कार्यक्रमाचा आनंद घ्या.

Post a Comment

0 Comments