समाजातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, इतिहासाचे गाढे अभ्यासक तथा प्रभावी वक्तृत्व आणि भारदस्त लेखन शैली असलेले
श्री.भिकनभाऊ जाधव यांची सर्वानुमते राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वेसर्वा भगवंत सेवक धर्मनेता मा. किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार, धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांच्या शुभाशीर्वादाने व शुभहस्ते तसेच राष्ट्रीय अध्यक्ष *मा. प्रा. विलासभाऊ राठोड यांच्या प्रमूख उपस्थितीत काल दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्री.भिकनभाऊ जाधव यांना नियुक्ती पत्र देऊन प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
भारतातील गोर बंजारा समाजातील अग्रगण्य मानली जाणारी राष्ट्रीय बंजारा परिषद ही प्रसिद्ध उद्योगपती धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या कल्पक बुद्धी आणि दूरदृष्टीतुन उदयास आलेली संघटना आहे. ही संघटना गोर बंजारा धर्मसत्ता, राजसत्ता, साहित्यसत्ता, शैक्षणिक आणि प्रशासकीय सत्ता मिळविण्याच्या हेतूने कार्य करत आहे. संघटनेचे महाराष्ट्रासह इतर राज्यात सर्वदूर जाळे पसरलेले असुन समाजाच्या न्याय हक्क अधिकार व सन्मानासाठी सदैव तत्पर असते.
अशा या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मा भिकनभाऊ जाधव यांनी काल स्वीकारली. श्री भिकनभाऊ जाधव यांना प्रशासकीय सेवेचा आणि कायद्याचा दांडगा अनुभव आहे. समाजाची तळमळ असणाऱ्या भिकनभाऊंचा मनमिळाऊ स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची पद्धत खुप चांगली आहे.ते राष्ट्रीय बंजारा राजकीय परिषदेच्या महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी कार्यरत होते. अखेर त्यांचा कार्य पाहुन त्यांना बढती मिळाली. त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा अशा भावना व्यक्त होत आहेत.
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता मधुकरभाऊ जाटोत, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख सुहासभाऊ पवार, प्रदेश सचिव उमेशभाऊ राठोड, प्रदेश उपाध्यक्ष श्यामभाऊ राठोड, श्रावणभाऊ चव्हाण, प्रेमकिसनभाऊ राठोड, राज्य प्रसिद्धीप्रमुख एस.पी.चव्हाण फौजी तसेच मुंबई, पुणे, मराठवाडा,विदर्भ व खानदेश, विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments