Ticker

6/recent/ticker-posts

मातंग समाज मेळावा व नवनिर्वाचित आमदार श्यामभाऊ खोडे यांचा सत्कार


मातंगांनी आता राजकीय समाज बनलं पाहिजे : - पद्मश्री नामदेव चं. कांबळे यांचे प्रतिपादन

मंगरूळ नाथ
 संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर मातंग समाज हा मोठ्या लोकसंख्येमध्ये भरपूर आहे , परंतु राजकारणाविषयी तो तितकासा गंभीर नाही . ही बेफिकिरी त्याच्या सामूहिक प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा ठरतो . तो जर दूर करायचा असेल तर मातंगांनी आता राजकीय समाज बनलं पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री नामदेव चं. कांबळे यांनी केले . मंगरूळपीर येथे रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी मातंग समाज मेळावा व नवनिर्वाचित आमदार श्यामभाऊ खोडे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते .

 राजकारणात काही मिळवायचं असेल तर त्या पक्षाशी असणारी आपली निष्ठा आणि संयम ढळू न देता जोमाने काम करावं लागतं .  त्याचे फळ पुढे मिळतच असते . असेही परखड मत पद्मश्री नामदेव चं. कांबळे यांनी मातंग समाजासमोर मांडले .

      या मातंग मेळाव्याचे उद्घाटक असलेले प्रा. दिलीप जोशी म्हणाले पद्मश्री कांबळेंसारखे व्यक्तिमत्त्व आपल्या वाशिम जिल्ह्यातील आपणा सर्वांसाठी खूप मोठी उपलब्धी आहे . अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीचा वारसा ते समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत . आज घडीला पद्मश्री कांबळेंसारखं लोकमान्यता असलेलं व्यक्तीमत्व मातंग समाजामध्ये दुसरं कुणीच नाही . त्यांच्या शब्दाला शासन दरबारी म्हणूनच वजन आहे , मातंग समाजाने त्याचा लाभ करून घेतला पाहिजे असेही दिलीप जोशी यांनी मातंग समाजाला आवाहन केले . मुख्य अतिथी म्हणून असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून नवी आव्हाने , नव्या दिशा मातंग समाजाने ओळखून तशी वाटचाल करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले . या कार्यक्रमाचे निमंत्रक असलेले गंगाधर कांबळे यांनी समाज बांधवांसमोर अतिशय स्फूर्तिदायक भाषण देत , ' हिंदुत्व हेच , माझं अस्तित्व ' असा नारा देत उपस्थित समाज बांधवांनी हा नारा कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन केले . सत्कारमूर्ती नवनिर्वाचित आमदार श्यामभाऊ खोडे यांनी सत्काराला उत्तर देताना मातंग समाज हा धनशक्तीपुढे थोडाही न झुकता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . युवा सामाजिक कार्यकर्ते दिपक भालेराव , नितेश पिसोळे यांनीही आवेशपूर्ण उद्बोधन केले . यावेळी व्यासपीठावर माजी पं. स. सभापती भास्कर पाटील शेगीकर , सरपंच संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाकधने , रविंद्र ठाकरे , उमेश गावंडे , पांडुरंग कोठाळे , अनिल कांबळे , विशाल ठोकळ , सामाजिक कार्यकर्ते अश्विनी औताडे , वनमाला पेंढारकर , विजय भोजने आदिंची उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे आयोजक भगवानराव पिसोळे यांनी प्रास्ताविक केले . सूत्रसंचालन डिगांबर आमटे , ज्ञानेश्वर तायडे यांनी करून अतुल गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले . या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळींची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments