Ticker

6/recent/ticker-posts

गृहअर्थशास्त्र विभागाची प्री प्रायमरी स्कूल ला भेट-

मंगरूळपीर-श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा द्वारा संचालित स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळा अंतर्गत वाय. सी. सी. बी .एस. सी. प्री प्रायमरी स्कूल ला दिनांक 11 /12/ 2024 रोजी भेट देण्यात आली.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय कुमार तसेच प्रमुख अतिथी कोमल मॅम समन्वयक प्रा. एस .एस. जाजू व बी.ए. भाग 3 चे विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रतिमा पूजन करून पुष्पगुच्छ द्वारा मान्यवरांचे स्वागत करण्यात आले ,त्यानंतर वर्ग फर्स्ट च्या विद्यार्थी सोबत प्ले थेरपीच्या अंतर्गत त्यांच्याशी हितगुज, चर्चा करण्यात आली. त्यात बी.ए. भाग 3 चे विद्यार्थ्यांनी खेळणे द्वारा त्यांना विविध विषयाची माहिती दिली जसे बॉडी पार्ट, वेगवेगळ्या फळांचा महत्त्व शरीरासाठी कसे उपयोगी आहे, तसेच झाडे हे का लावावे, झाडांचे काय महत्त्व आहे ,झाडे ऑक्सिजन देते अशा विविध विषयांवर खेळणे तयार करून त्यांना माहिती दिली.
          ही भेट संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रा.एस. एस. जाजू यांनी आयोजित केले. यामध्ये बी.ए. भाग 3 चे अश्विनी फड, प्रणाली भोयर ,रेखा भगत ,चैताली महल्ले , भावना खंडारे, चंचल राऊत इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व 40 छोटे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला व ही भेट संपन्न झाली.
             प्रा. एस. एस. जाजू
                 समन्वयक
     गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ

Post a Comment

0 Comments