मंगरूळपीर पश्चिम विदर्भात सिंचनाची क्रांती घडवन आणणारे वाशिम जिल्ह्यात सिंचन महर्षी म्हणून प्रसिद्ध असणारे आदरणीय ठाकरे साहेब
शेतकरी आमचे दैवत असून आपल्या भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते या शेतकऱ्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केले आहे . या कार्यक्रमात साहेबांच्या मातोश्री आशीर्वाद देण्यासाठी मंचावर उपस्थित होत्या
आज आदरणीय साहेबांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त उसळलेला जनसागर पाहून खरंच मन भरून आले साहेबावर प्रेम करणारी ही खरी मंडळी आहे.
माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा येथील कृषी बाजार समिती दिनांक 12 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला या कार्यक्रमात ते बोलत होते. या अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा
कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार बाबुसिंग महाराज, माजी मंत्री सुबोध सावजी, माजी आ. किसनराव गवळी, माजी आ. विजयराव जाधव, माजी आ. तोताराम कायंदे, जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प. सभापती सुरेश मापारी, दत्तराज डहाके, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू,
चंद्रकांत पाकधने, राम पाटील ठाकरे, बाळू पाटील यांच्यासह बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जि प, प. स. सदस्य कृषि उत्पन्न बाजार समिती, जिनिंग प्रेसिंग व तसेच खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी व संचालक व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
आज मंगरुळपीर शहर येथे लोकनेते माजी मंत्री मा.श्री. सुभाषरावजी ठाकरे साहेब यांच्या अम्रुत महोत्सवी वाढदिवस सोहळ्याला उपस्थित वाशीम मंगरूळपीरचे नवनिर्वाचित आमदार शामभाऊ खोडे , पुरुषोत्तम भाऊ चितलांगे आदरणीय साहेबांना शुभेच्छा देतांना.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.ना. चंद्रकांत दादा ठाकरे आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते...
मा. ठाकरे साहेब यांची ७५ वा वाढदिवस "अमृत महोत्सव साजरा
करण्यात आला . भव्य दिव्य अशा या
अभीष्टचिंतन सोहळ्याला महाराष्ट्रातील
अनेक आजी माजी मंत्री आमदार यांनी
उपस्थिती लावली होती. प्रचंड जनसमुदाय साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला होता .
सुर संगम प्राध्यापक संजू इंगळे, मो. इद्रिस यांनी उत्तमरीत्या गायन केले
या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय कावरे आणि प्रा. खोडके यांनी पार पाडले . साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांच्या भोजनाची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती मोठ्या आनंदाने सर्व मान्यवरांनी भोजनाचाही आस्वाद घेतला .
0 Comments