Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचा 100% निकालाची परंपरा यंदाही कायमगोपाळ वाच्छे 86.83% गुणांसह प्रथम



वाशिम तालुका प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक सैनिक शाळेने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही यशस्वीरित्या कायम राखली आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेचे एकूण 33 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे सर्वच विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशात गोपाल डी. वाच्छे याने 86.83% गुणांसह प्रथम क्रमांक, विष्णू डी. बेले याने 84.17% गुणांसह द्वितीय क्रमांक तर रामेश्वर के. मुंढे याने 82.17% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या यशात भर घातली आहे.

शाळेत राबविण्यात आलेल्या *‘यशवंत इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम’*चा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाल्याचे शाळेचे प्राचार्य प्रा. एम.एस. भोयर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय स्वतःच्या अथक परिश्रमांसोबतच प्राचार्य प्रा. एम.एस. भोयर, उपप्राचार्य प्रा. एस.बी. चव्हाण, वर्गशिक्षक प्रा. प्रदीपराव व्ही. गाडेकर, तसेच प्रा. आर.जी. नकवाल, प्रा. एस.आर. सातपुते, प्रा. डी.के. सूर्यवंशी, प्रा. एस.एच. लाहेवार, प्रा. वाय.एल. कदम व पालकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष मा. सुभाषराव ठाकरे (माजी राज्यमंत्री), सचिव चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप एन. पाटील, प्राचार्य एम.एस. भोयर, उपप्राचार्य एस.बी. चव्हाण व संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

ही माहिती शाळेचे प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments