लक्ष्मीचंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेलुबाजारचा
निकाल – १३ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा अधिक गुण
शेलुबाजार वार्ता:
प्रत्येकवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीचंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेलुबाजारने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून, यंदाच्या इ. १० वी (एसएससी) परीक्षेमध्ये संस्थेच्या तेरा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची चिकाटी, कठोर परिश्रम आणि शाळेतील सर्व शिक्षकवर्गाचे मोलाचे मार्गदर्शन, तसेच पालकांचा सातत्याने मिळालेला पाठिंबा यांचा मोठा वाटा आहे.
९०% पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी:
- छबुताई फकीरा जाधव – 93.40%
- आदिती बंडू सुर्वे – 91.60%
- चेतन गणेश धोत्रे – 91.40%
- वैष्णवी विनोद बनसोड – 91.00%
- वेदिका गणेश खोरणे – 91.20%
- अनुष्का पुंडलिक रोकडे – 91.00%
- श्रावणी संतोष डोफेकर – 90.80%
- दिव्या विजय चक्रनारायण – 90.80%
- रिद्धी गजानन ठाकरे – 90.60%
- निधी प्रभाकर रीसोडकर – 90.40%
- नीलाक्षी भारत दंदे – 90.40%
- मानसी विनोद वानखेडे – 90.00%
- मिरा दिनकर मुळे – 90.20%
या विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री मनीषजी कर्नावट, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवर्ग तसेच शाळा समितीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे यश म्हणजे केवळ शाळेचे नव्हे, तर संपूर्ण शेलुबाजार परिसराचे गौरवाचे moment ठरले आहे .
0 Comments