Ticker

6/recent/ticker-posts

शेलुबाजार येथे अवैध जुगार अड्ड्यावर वाशिम पोलिसांची धडक३.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त; १२ आरोपींवर गुन्हे दाखल


 

मंगरूळपीर सुधाकर चौधरी 


वाशिम जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने विशेष मोहिमेअंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे कारवाई करत ३.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत १२ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ९ मे २०२५ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. नवदीप अग्रवाल (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम व मंगरुळपीर कार्यालयीन पथक, तसेच पोलीस ठाणे मंगरुळपीरच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली.

ग्राम शेलुबाजार येथील शिवकमल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट च्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या वरली मटका व जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी रोख रक्कम १,०२,३८० रुपये, दोन मोटारसायकली, नऊ मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ३,४३,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –

  1. विशाल विलास चौधरी (३५), रा. शेलुबाजार
  2. शरद अनंतराव बोबडे (५५), रा. शेलुबाजार
  3. मारोती सिताराम टोंचर (६०), रा. शेलुबाजार
  4. बापूराव प्रभाकर चव्हाण (५२), रा. शेलुबाजार
  5. दिलीप रामभाऊ हिवरे (५५), रा. शेलुबाजार
  6. विनोद किसन मनवर (४१), रा. लाठी
  7. बाळू तुळशीराम ठाकरे (५५), रा. पार्डीताड
  8. दिलीप ज्ञानबा नितनवरे (५५), रा. शेलुबाजार
  9. नरेंद्र केशवराव आडोळे (४५), रा. शेलुबाजार
  10. धम्मा सोनुने, रा. नांदखेडा
  11. पिंटू ऊर्फ रामेश्वर मोहळे, रा. नांदखेडा
  12. श्रीकांत वानखेडे, रा. खामगाव

वरील आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे मंगरुळपीर येथे महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत सपोनि अतुल इंगोले, पोउपनि ज्ञानेश्वर नाईकवाडे, पोहेकॉ. रविंद्र कातखेडे, अनंता डौलसे, सुमीत चव्हाण, हरिभाऊ कालापाड, अरविंद राठोड, स्वप्नील शेळके यांचा मोलाचा सहभाग होता.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या दडपशाहीमुळे जुगार संचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments