संघटनेतून समाजसेवेच्या दिशेने ठाम पावले!"
वाशिम, दि. 10 मे 2025
समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि पोलीस-नागरिक सुसंवाद या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे यांची पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली यांच्या वाशिम जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख मा. श्री. गजानन भगत यांच्या मार्गदर्शनात, तसेच महाराष्ट्र प्रवेश अध्यक्ष मा. श्री. सुनिलभाऊ पाटील यांच्या संमतीने करण्यात आली आहे. यामध्ये विदर्भ जनसंपर्क प्रमुख मा. श्री. अंकुश मिटकरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सौ. ठाकरे यांनी यापूर्वी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, महिलांच्या हक्क, सुरक्षा आणि मार्गदर्शनासाठी त्यांनी दिलेली सेवा उल्लेखनीय आहे. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या कार्याची योग्य पावती मानली जात आहे.
या नियुक्तीमुळे वाशिम जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना नवे बळ मिळेल, तसेच पोलीस प्रशासन व जनतेतील विश्वास वाढीस लागेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
सौ. ज्योतीताई ठाकरे या दिनांक 10 मे 2026 पर्यंत या पदावर कार्यरत राहणार असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यासाठी संघटनेकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
0 Comments