वाशिम (दि. १४ मे २०२५) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाशिम जिल्हाध्यक्षपदी श्री. पुरुषोत्तमजी चितलांगे यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निमित्ताने आज त्यांना भेटून मान. नगरसेवक श्री. सचिन पवार यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस यश मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या शुभेच्छा भेटीवेळी श्री. सचिन पवार यांच्यासह मुकेश शिंदे, सुनील राठोड, दीपक चुंबळे, शामभाऊ टेटवार हे मान्यवरही उपस्थित होते. या प्रसंगी श्री. चितलांगे यांचा व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात उपस्थितांनी एकत्र येऊन नवे नेतृत्व अधिक बळकट व्हावे, आणि पक्षाची कामगिरी जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे पुढे जावी, असा विश्वास व्यक्त केला.
0 Comments