पुरुषोत्तमभाऊ -लताताई यांचा संसार दिव्य तेजाचं दान, हसतमुख स्वभाव, मायेची जणू जुळलेली जान। कार्यकर्त्यांच्या ओठी नाव, समाजसेवेचं मान, स्नेह, श्रद्धा, प्रेमात गुंफलेलं सुंदर जीवनगान ।
मंगरूळपीर येथील पुरुषोत्तम लालचंद चितलांगे हे नाव समाजकार्य, प्रामाणिक स्वभाव आणि सतत दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे सर्वश्रुत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक आनंददायी, हसतमुख भाव असतो, जो आजूबाजूच्यांनाही सकारात्मक ऊर्जा देतो.
राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असूनही त्यांनी कधीच पदासाठी हव्यास न दाखवता, भारतीय जनता पार्टीच्या एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सातत्याने कार्य केले आहे. कोणताही पक्षीय वा सामाजिक कार्यक्रम असो, पुरुषोत्तम भाऊ नेहमी अग्रेसर असतात. इंडियन गॅस चे ते यशस्वी संचालक आहेत.
२००१ च्या शुभवर्षी, वाजली सनई-चौघडा,
त्यांच्या जीवनात लताताई चितलांगे या त्यांच्या अर्धांगिनी म्हणून लाभल्या. लताताई म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप — सतत आनंदी, हसतमुख आणि कुटुंब व सामाजिक जीवनात समतोल राखणाऱ्या. त्यांनी पुरुषोत्तम भाऊंच्या खांद्याला खांदा लावून अनेक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.
या दाम्पत्याच्या सहजीवनात दोन अनमोल रत्नं लाभली — संस्कृती, ही कन्या म्हणजे त्यांच्या आयुष्यातील लक्ष्मीचे आगमन आणि संस्कार, हा सुपुत्र म्हणजे विचारशील, हसतमुख आणि मूल्यांना जपणारा एक प्रतिभावान युवा.
पुरुषोत्तम भाऊ हे मित्रमंडळ, कुटुंब वा समाज यांच्यात नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालणारे, कोणत्याही प्रकारचा गर्व न बाळगता ‘पुरुषोत्तम’ या नावाला साजेसे असे व्यक्तिमत्त्व आहेत.
आज त्यांच्या सहजीवनाच्या या सुंदर प्रवासाला सेवेचं व्रत हाती, प्रामाणिकतेचा प्रकाश, पुरुषोत्तम भाऊंचा असाच आहे विश्वास। सदैव अग्रेसर, नम्रतेची शान, कार्यकर्त्यांच्या मनात त्यांचं विशेष स्थान।
वाशिम खबर आवाज महाराष्ट्र च्या वतीने पुरुषोत्तम भाऊ चितलांगे व लताताई चितलांगे यांना त्यांच्या लग्नवाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सहजीवनात असेच प्रेम, विश्वास, आणि सामाजिक बांधिलकीचे बळ कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
0 Comments