कारंजा | 9 मे 2025
समाजहितासाठी लेखणीला शस्त्र बनवणाऱ्या आणि माणुसकीच्या मूल्यातून पत्रकारिता जपणाऱ्या सौ. मोनाली विनोद गनविर, संपादक – महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह यांचा आज वाढदिवस!
त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे दुःख, वेदना, अन्याय आणि समस्या मांडत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक संवेदनशीलतेची जाण, तळमळीतून होणारी पत्रकारिता आणि निर्भीड भूमिका ही त्यांची ओळख ठरली आहे. बातमीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे पार पाडले आहे.
सामाजिक कार्य, समाजप्रती असलेली निःस्वार्थ भावना आणि सत्याचे समर्थन करत असताना त्यांनी अनेक वेळा अडथळ्यांचा सामना केला, पण कधीही आपले तत्त्व सोडले नाही. त्यांच्या कार्यातून अनेक तरुण पत्रकारांना प्रेरणा मिळते आहे.
सौ. मोनाली गनविर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, यशस्वी दीर्घायुष्य आणि अजून अधिक प्रभावी कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
आपली लेखणी सदैव सत्यासाठी झगडणारी ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– शुभेच्छुक,
सुधाकर चौधरी
संपादक, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने
0 Comments