Ticker

6/recent/ticker-posts

मा. राधाकृष्ण विखे पाटील आज वाशिम दौऱ्यावर; अनसिंग येथे 'विकसित भारत' कार्यक्रमात मार्गदर्शन

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे संपर्क मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील अनसिंग येथे "



नवीन जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांचा मंडळातर्फे भव्य सत्कार

अनसिंग, 

  –
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे संपर्क मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज दिनांक ८ जून रोजी अनसिंग (ता. मंगरूळपीर) येथे दौरा निश्चित झाला असून, दुपारी १२ वाजता राजस्थानी भवन येथे होणाऱ्या भाजपा आयोजित कार्यक्रमात ते "विकसित भारताचा ११ वर्षांचा प्रवास : सेवा, सुशासन व गरीब कल्याण" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमात जिल्ह्यातील विकासकामांचा तसेच भाजपा संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला जाणार असून, विखे पाटील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळी भाजपाचे नव्याने निवडलेले जिल्हाध्यक्ष मा. पुरुषोत्तम चितलांगे यांचा  मंडळातर्फे भव्य सत्कार आयोजीत करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. श्यामभाऊ खोडे असून, प्रमुख पाहुणे म्हणून आ. सईताई ,धर्मगुरू, आ. महंत बाबूसिंग महाराज, मा. अनंतराव देशमुख, मा. विजयराव जाधव, मा. राजू पाटील राजे, मा. लखन मलिक (माजी आमदार)  मा. सुरेश लुंगे (माजी जिल्हाध्यक्ष), मा. श्यामभाऊ बडे, मा. पुरुषोत्तम राजगुरू (माजी आमदार) 

 (नरेंद्रजी कॉलेज), मा. अशोकभाऊ हेडा यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात भाजपाचे नेते, पदाधिकारी, महिला आघाडीच्या सदस्या, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, जिल्हाध्यक्ष चितलांगे, आमदार खोडे आणि मंडळ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


पत्रकाराची टिपणी

 (सुधाकर चौधरी)

मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता, जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कारभाराचा आत्मपरीक्षण करण्याची संधी ठरणार आहे. जिल्ह्यातील नव्या नेतृत्वाची नियुक्ती, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, आणि विकसनशील भारताच्या ध्येयाचा पुनरुच्चार – हे सारे घटक या कार्यक्रमाला राजकीयदृष्ट्या महत्वाचे परिमाण देत आहेत. विशेषतः युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, ही कार्यक्रमामागील एक लक्षणीय भूमिका मानली जात आहे. विखे पाटील यांच्या भाषणातून आगामी राजकीय दिशा आणि भाजपाच्या नियोजनाची झ

Post a Comment

0 Comments