मंगरूळपीर, दि. ७ जून २०२५
: मंगरूळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मर्ग क्रमांक २६/२०२५, कलम १९४ वि.एन.एस.एस. अंतर्गत नोंद करण्यात आली असून, पोलीसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मृत इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:
- वय: अंदाजे ३५ ते ३८ वर्ष
- रंग: काळा सावळा
- उंची: सुमारे ५ फूट ५ इंच
- केस: लांब व काळे
- कपडे: फिकट निळ्या रंगाची निकर (इतर कपडे नसलेले)
- गोंदण: उजव्या हातावर "K" असे गोंदलेले
- दाढी-मिशी: साधारण स्वरूपाची
"अनोळखी मृत इसमाचा फोटो (मंगरूळपीर पोलीस स्टेशन सौजन्याने)"
पोलीस निरीक्षक मंगरूळपीर व तपास अधिकारी यांनी सांगितले की, सदर इसमाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे अत्यावश्यक आहे. याबाबत कोणालाही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
संपर्क क्रमांक:
- पोलीस निरीक्षक: 📞 ९४२२९५८६१५
- तपास अधिकारी: 📞 ९०४९९७५०१५
- मंगरूळपीर पोलीस स्टेशन: ☎️ ०७२५३-२६०३३३
पोलीस विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, ओळख पटल्यास पुढील तपास प्रक्रियेस वेग येणार आहे.
0 Comments