Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक झालो म्हणे... पण ओळखच बनावट! वाशिमच्या गल्लीपासून मंत्रालयापर्यंत 'शालार्थ आयडी'चा मोठा घोटाळा उघड

बनावट शालार्थ आयडी घोटाळा – वाशिम जिल्हा तपासाच्या भोवऱ्यात

✍️ 

किशोर देशमुख
मंत्रालय कार्यकारी संपादक, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे 


मुंबई, नागपूरसारख्या मोठ्या शहरात सुरू झालेला ‘बनावट शिक्षक’ घोटाळा आता गावपातळीवर पोचतोय. शाळेमधल्या खऱ्या शिक्षकांपेक्षा बनावट शालार्थ आयडी वापरून ‘नोकरीवर’ लागलेले लोक किती आहेत, याचा अंदाजच नाही. शासनाने या प्रकरणात SIT म्हणजेच विशेष तपास पथक नेमून चौकशीला सुरुवात केलीय.

पण खरा स्फोट तर वाशिम जिल्ह्यात होणार असं दिसतंय.


🚨 कसा झाला घोटाळा?

  • शिक्षक बनायचंय पण पात्रता नाही? मग ‘बनावट शालार्थ आयडी’ तयार करून कामावर रुजू व्हा!
  • शासनाच्या रेकॉर्डवर हे शिक्षक ‘मुळात अस्तित्वात’च नाहीत!
  • अशा लोकांकडून वर्षानुवर्षे पगार उचलला गेला!
  • शिक्षण खात्यातल्या काही अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याशिवाय हे शक्यच नव्हतं!

🏛️ शासनाची कारवाई – भुसे साहेबांचा दणका

  • शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत जाहीर केलं –
    घोटाळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, आणि पैसे वसूलही करू!
  • संपूर्ण राज्यभर तीन महिन्यात चौकशी पूर्ण करणार.

🔍 वाशिम जिल्ह्यातील धक्कादायक माहिती

  • वाशिम जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातही घोटाळ्याची कुजबूज.
  • नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर किशोर देशमुख यांनी माहिती अधिकारात विचारणा केली.
  • पण शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती देण्याऐवजी उलट ‘बोध होत नाही’ अशी पत्रव्यवहाराची नाटके केली.
  • देशमुखांनी स्वतः कार्यालयात जाऊन, “बोध होईना म्हणताय, मी आलोय समजावून सांगायला, माहिती द्या!” अशी ठणकावून मागणी केली.

🗣️ सभागृहात आमदार बंबांचा आवाज:

  • वाशिमचे आमदार प्रशांत बंब यांनी सभागृहात आवाज उठवला.
    “शिक्षण खात्यातलेच अधिकारी गुंतलेत. त्यांच्याकडून चौकशी नाही झाली पाहिजे!”
  • SIT मध्ये निष्पक्ष, कायद्याच्या चौकटीत काम करणारे अधिकारी असावेत, अशी आग्रही मागणी.
  • शासनाने ही मागणी मान्य केली आणि आता राज्यभर तपास सुरू झालाय.

😠 वाशिमचे उपशिक्षणाधिकारी ‘अहाळे’ प्रकरण

  • गेल्या ३-४ वर्षांपासून एकाच अधिकाऱ्याकडे शिक्षणाचा चार्ज.
  • संस्थाचालक, कर्मचारी आणि मान्यता देण्याच्या व्यवहारात ‘डील’ आणि ‘ठेकेदारी पद्धत’!
  • लाखो रुपयांचे व्यवहार, परवानग्या, वेतन काढण्यासाठी 'खास लंगोटी' जमलेली.
  • ही माहिती माहिती अधिकारातून समोर येणार, त्यामुळेच अधिकारी टाळाटाळ करतायत.

📌 वाशिम – घोटाळ्याचे नवे केंद्रबिंदू

  • जिल्हा परिषद वाशिममध्ये ‘माहिती अधिकार’ दाखल झाला.
  • सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांमधल्या संगनमताचा फड उघड होणार!
  • शालेय शिक्षण विभागात लपलेली कुचंबणा आता उघडी पडणार.

"माहिती द्या, नाहीतर आम्हीच उघड करतो!" – हा इशारा आता केवळ एका पत्रकाराचा नाही, तर लोकशक्तीचा आवाज आहे.



Post a Comment

0 Comments