Ticker

6/recent/ticker-posts

शेलुबाजार महसूल मंडळात अतिवृष्टीग्रस्त शेतांची पाहणी – आमदार श्यामखोडे यांच्या सूचनेवरून तहसीलदार बंडगर मैदानात



 मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार महसूल मंडळातील पिंपरी (अवगण), पिंपरी (खु), कंझरा, गोगरी, हिंरंगी, खेर्डा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पेरणीच फसली असून, शेतात टाकलेले बियाणे उगवलेच नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्यामभाऊ खोडे यांच्या सूचनेवरून तहसीलदार कु. शितल बंडगर यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी केली.


"आभाळ फाटलं, शेतकऱ्याचं स्वप्न विखुरलं... तहसीलदार मॅडम धावल्या आश्वासक हात घेऊन"

या पाहणी दौऱ्यात आमदारांचे स्वीय सहाय्यक सिद्धेश देशमुख, भाजप शेतकरी नेते विनोद पाटील जाधव, मंगरूळनाथ भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र ठाकरे, तालुका उपाध्यक्ष अनिल काटकर, किशोर इंगोले, किशोर मूखमाले, नंदकिशोर पावसे, गजानन अवगण, कैलास पाटील, डीगंबर राऊत तसेच संबंधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहणी दरम्यान तहसीलदार बंडगर मॅडम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, "ज्यांची पेरणी अतिवृष्टीमुळे फसली आहे, त्यांनी आपल्या संबंधित तलाठ्याकडे त्वरित तक्रार नोंदवावी. त्यानंतर मंडळ अधिकारी व तलाठी स्वतः बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करतील व नुकसान अहवाल तयार केला जाईल," असे स्पष्ट केले.

या पाहणीमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, शासनाने लवकरात लवकर भरपाईची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


— वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी

Post a Comment

0 Comments