Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना जिल्हाप्रमुख मंगेशदादा काळे यांचे मोठे बंधू संतोष काळे यांचे दुःखद निधन परिसरात शोककळा, अंत्ययात्रा बुधवार ६ ऑगस्ट रोजी


💐 श्रद्धांजली बातमी 💐

अकोला, दि. ५ ऑगस्ट (प्रतिनिधी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख मंगेशदादा काळे यांचे ज्येष्ठ बंधू संतोष रामभाऊ काळे (वय ५३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. या दु:खद घटनेने काळे कुटुंबियांसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकोला नगर परिषदेचे माजी सभापती रामभाऊ काळे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. संतोषदादा हे अत्यंत मनमिळावू, स्नेही, प्रेमळ आणि समाजाशी ऋणानुबंध जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सौम्य आणि संयमी स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके होते. सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरातील लोक, शिवसेनेचे कार्यकर्ते, हितचिंतक, राजकीय नेते आणि नागरिकांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी धाव घेतली. काळे कुटुंबियांच्या या दुःखात सहभागी होत अंत्यदर्शन घेतले.

अंत्ययात्रा बुधवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या केशवनगर, रिंगरोड, अकोला येथील निवासस्थानावरून निघणार आहे. अंत्यसंस्कार कौलखेड येथील स्मशानभूमीवर करण्यात येणार आहेत.

संतोषदादांचे अचानक जाणे हे काळे कुटुंबियांसाठीच नव्हे तर अकोल्यातील शिवसैनिक, मित्रपरिवार आणि स्थानिक जनतेसाठीही मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना...
भावपूर्ण श्रद्धांजली... ॐ शांती 💐

Post a Comment

0 Comments