Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या आक्रोशाला न्याय द्या; शिवसेनेचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा



 तहसीलदार रवींद्र राठोड यांना निवेदन


मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) :

"शेतकऱ्यांचे घामाचे थेंब करपले... आता जर मदत नाही दिली तर रस्त्यावर रक्ताचे थेंब गळतील!"


तालुक्यात झालेल्या अतिसुष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी बांधवांच्या डोळ्यांसमोर आयुष्यभराची पुंजी करपून गेली आहे. या जळत्या प्रश्नावर तात्काळ दिलासा द्यावा, या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.  तहसीलदार रवींद्र राठोड यांना निवेदन देऊन तातडीने नुकसान भरपाई वितरित करण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी तालुक्यातील शिवसेनेचे रामदास पाटील सुर्वे, सचिन परळीकर पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांची हळहळ व्यक्त करताना नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित न सोडविल्यास आम्हाला कठोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

तहसीलदार राठोड यांनी निवेदन स्वीकारून पंचनामे जलदगतीने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यांत एकच प्रश्न दिसत होता – “दिलास्याची तारीख नेमकी कधी ठरणार?”

करपलेलं पीक नव्हे तर शेतकऱ्याचं आयुष्य राखेत गेलंय भरपाई नाही तर संघर्ष ठरलेला!"



Post a Comment

0 Comments