Ticker

6/recent/ticker-posts

न्यायप्रिय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार महिलांनी आचरणात आणावेत – वनमाला पेंढारकर



प्रतिनिधी : मंगरूळपीर

स्थानिक मंगरूळपीर पंचायत समिती (जुनी) येथील एकात्मिक महिला व बाल विकास विभाग तसेच राज्य महिला आयोगांतर्गत कार्यरत प्रगती समुपदेशन केंद्रात न्यायप्रिय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.


कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. यावेळी शिवरत्न महिला मंडळाच्या अध्यक्ष व राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कारप्राप्त वनमाला (मला ताई) पेंढारकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले – "अहिल्यादेवी या केवळ माळवा प्रांताच्या कुशल शासक नव्हत्या, तर त्या न्यायप्रियता, दानशूरता आणि प्रशासकीय कौशल्याच्या उत्तुंग प्रतीक होत्या. पाणी व्यवस्थापन, मंदिरे बांधणी, लोककल्याणकारी योजना या त्यांच्या कार्यातून महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याची महानता आजच्या महिलांनी आचरणात आणली, तर समाज प्रगतिशील होईल."

मल्हाररावांच्या निधनानंतर माळवा राज्याची धुरा सांभाळत, अहिल्यादेवींनी कुशल प्रशासन घडवले, दानधर्मात मोलाची भर टाकली आणि जनतेच्या मनात "पुण्यश्लोक" म्हणून स्थान मिळवले, असा उल्लेखही पेंढारकर यांनी केला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती अर्चना फाले (बाल विकास प्रकल्प अधिकारी), रवी दहापुते सर (एकात्मिक बाल विकास अधिकारी), ज्ञानेश्वर राठोड (कनिष्ठ लिपिक), लता चव्हाण (पर्यवेक्षिका), कौशल्याबाई बेलखेडे (अंगणवाडी संघटिका), मैथिली घनवर (पर्यवेक्षिका), जयश्री मुळे (अंगणवाडी सेविका), मोनिका राठोड (सामाजिक कार्यकर्त्या), किरण मिसाळ, वैशाली राऊत, मीरा टोचर (अंगणवाडी सेविका), यमुना ताई बेलखेडे (सामाजिक कार्यकर्त्या), परेश राऊत (सहाय्यक निबंध), कामाक्षीताई सोने (दक्षता समिती सदस्य), मनीषा दाभाडे (विधी सल्लागार), सुधीर मुंदरे (समुपदेशक), विशाखा देशमुख (दक्षता समिती सदस्य) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दाभाडे यांनी केले, तर आभार सुधीर मुंदरे यांनी मानले.
या उपक्रमाचे आयोजन शिवरत्न महिला मंडळ आणि गोरोबाकाका महिला संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. महिला मंडळाच्या अनेक सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.



Post a Comment

0 Comments