Ticker

6/recent/ticker-posts

“आरोग्यसेवा की लूटसेवा? – आदित्य बिर्ला हॉस्पिटल प्रकरणानंतर सरकारला जाब”


आरोग्य म्हणजे सेवा, त्याग, माणुसकी आणि जीव वाचवण्याचं पवित्र ध्येय. पण आजचं वास्तव किती भयंकर आहे, हे पिंपरी-चिंचवडमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटलने दाखवून दिलं.

काल एका अपघातग्रस्त रुग्णाला तातडीने या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्याकडे कॅशलेस इन्शुरन्स असतानाही रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांकडून तब्बल ₹४०,००० चा ऍडव्हान्स वसूल केला. एवढ्यावरच थांबले नाही तर डिस्चार्ज प्रक्रियेत तासन्‌तास अडवून, “आंतरगत प्रोसेस”च्या नावाखाली रुग्ण व कुटुंबियांची मानसिक व आर्थिक कोंडी केली गेली.

मग जनतेला प्रश्न पडतो —
👉 हा रुग्णालय व्यवसाय आहे की लुटीचं केंद्र?
👉 कॅशलेस इन्शुरन्स योजना ही केवळ कागदोपत्री ढोंग आहे का?
👉 अशा रुग्णालयांवर सरकारचा अंकुश आहे की त्यांना मोकाट सोडलंय?

हे केवळ एका रुग्णाचं दुर्दैव नाही, तर हजारो कुटुंबांचा रोजचा अनुभव आहे. “अनपेक्षित बिलं, जादा शुल्क, विलंब व गैरसोयी” या नव्या आरोग्य संस्कृतीत जनता अक्षरशः उध्वस्त होत आहे.


सरकार व प्रशासनाला थेट सवाल

जर हे प्रकरण खरं असेल, तर मग आरोग्य विभाग झोपेत का आहे?
👉 रुग्णालय प्रशासनावर तात्काळ चौकशी का होत नाही?
👉 जबाबदारांना कठोर शिक्षा का होत नाही?
👉 लोकांच्या पैशांवर आणि भावनांवर लुट करणं, हा गुन्हा ठरवला जाणार की नाही?

सरकार आणि प्रशासनाने याकडे केवळ कागदी निवेदनांच्या माध्यमातून न पाहता, तातडीने भौतिक चौकशी करून गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.


जनता शांत बसणार नाही

“आरोग्यसेवा” ही व्यापाराची नव्हे, तर मानवतेची शपथ आहे.
जर अशा रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरलं, तर रुग्ण आणि जनता शांत बसणार नाही. रस्त्यावर उतरेल, आवाज उठवेल आणि मग प्रशासनाच्या पायाखालची जमीन खरोखर सरकेल.


✍️ संपादक : सुधाकर चौधरी
वाशिम खबर आवाज महाराष्ट्र



Post a Comment

0 Comments